आवाडे गटाच ठरलं : भाजपशी घरोबा!

Prakash Awade - BJP

कोल्हापूर : इचलकरंजी नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडीवेळी नवीन राजकीय उलाथापालथ घडली नाही; मात्र ताराराणी आघाडी आणि जांभळे गटाशी चर्चेचे गु-हाळ सुरू ठेवत आमदार प्रकाश आवाडे यांनी वजनदार आरोग्य खाते पदरात पाडून घेतले. आवाडे यांच्या धूर्त खेळीमुळे चाळके आणि जांभळे गट सत्तेबाहेर राहिला, तर राजर्षी शाहू आघाडी आणि भाजपला सत्तेच्या राजकारणात तडजोडीला सामोरे जावे लागले. त्यांना अनुक्रमे शिक्षण आणि आरोग्य समिती सभापतीवर पाणी सोडावे लागले.

विविध विषय समित्यांच्या निवडीवेळी आ. आवाडे यांचे वर्चस्व सिद्ध झाले असले, तरी आवाडे गटात मात्र कमालीची अंतर्गत धुसफूस झाली. आवाडेंचे कट्टर समर्थक शकुंतला मुळीक आणि बिल्कीस मुजावर यांना सभापतिपदापासून दूर गटातील वादही विकोपाला गेल्याचे दिसून आले. यातूनच मुळीक गटाने आवाडे गटाला रामराम केल्याच्या सोशल मीडीयावरील पोस्टही कमालीच्या व्हायरल झाल्या. गटावर नाराज झाल्याने त्याचा परिणाम आगामी पालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसून येणार ठेवण्यात आल्यामुळे त्याचे पडसादही निवडीपूर्वी उमटले. या निवडीवेळी आवाडे इचलकरंजी बाजी मारली.

आवाडे गट, ताराराणी आघाडी आणि जांभळे गट भाजपशी सलगी करीत राजर्षी शाहू आघाडीला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. इचलकरंजी नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडी मंगळवारी पार पडल्या. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेबाहेर असलेल्या ताराराणी आघाडीने सत्तेत पुन्हा येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली; मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. पालिकेच्या सत्ताकारणात सुरू असलेल्या डावपेचात आ. आवाडेंनी राजकीय अनुभव पणाला लावताना दिसत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER