अनाठायी उत्साह टाळा

Coronavirus Ganeshotsav Pune Editorial

Shailendra Paranjapeगौरी गणपती गेल्यावर घराघरातून गणपती बघायला लक बाहेर पडू लागलेत.  त्यामुळे रोज दीडस हजार करोनाचे रुगण पुण्यात बाधित होता आहेत. सार्वजनिक गणेसोत्सव मंडळांच्या मंडपात लोकांची झुंबड उडालीय. त्यामुळे प्रशासनाची ताबांळ उडालीय. रोजच्या रोज पोलीस तसंच प्रशासकीय अधिकारी लोकांना आवाहन करताहेत की गर्दी करू नका. सोश डिस्न्सिंगा पुरता फज्जा उडालाय. अनेक नागरिक घरातल्या कडेवरच्या मुलंनाही या गर्दीत घेऊन जाताहेत.

रोज दीड हजार करोनाचे (Corona) रुग्ण पुण्यात सापडताहेत आणि त्याचा दुसरा अर्थ असा की या दीड हजारपैकी तीन टक्क्यांपेक्षाही कमी म्हणजे चाळीस एक जण करोनामुळं मरण पावण्याची शक्यता आहे, अर्थात कोमॉर्बिटी म्हणजे इतर काही रोगांचा प्रादुर्भाव असलेल्यांना करोनाचा धोका अधिक आहे.

त्यामुळं रोजच्या रोज दीड हजार रुग्णांपैकी साडेचौदाशे बरे हाणार आहेत. ही त्यातल्या त्यात सकारात्मक बाब आहे. मात्र असं असलं तरी लोकांनी महत्त्वाचे सार्जनिक गणेशोत्सव (Ganeshotsav) मंडळांचे दर्शन ऑनलाइन घ्यावे. तसे झाले तरट करोनाटा प्राजुर्भाव कमी व्हायला मदत होइल.

पोलिसांनी मुळा हे काम नाहीये की लोकांनी करोनाचा प्रादुर्भाव होईल अशा गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून त्यांना रोखावं. प्रत्येक गोष्टीत सरकारनं काही करावं ही अपेक्षा असते आणि तसंच गणपती बघायला हाणं हा आमचा हक्कच आहे, असंही हिरिरिनं सांगितलं जातं.

हिंदूसणांच्या बाबतीतच निर्बंध असतात, हेही आणखी एक गैरसमज. करोनासारख्या साथीत महाविर जतंची असो की राम नवमी असो की रमजा इद सर्वधर्मियांनी संयम पाळलेला आहे. हा संयम सामान्य नागरिकांनी गणपती बघायला जातानाही पाळायला हवा. तसंच झालं तरच करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकेल.

मानाच्या सर्व गणेश मंडळांनी त्याच्या मांडवातच विसर्जन करायला निर्णय घेतलाय. हा निर्णय स्वागतार्ह आहे. गणेशोत्सवाचे प्रमुख असलेले मानाचे पाच गणपती आणि दगडूशेठ हलवाई मंडळ, मंडई मंडळ आणि भाऊ ऱंगारी मंडळ यांनी मंडपातच विसर्जन करायचं ठरवलंय. त्य्मुळे अनावश्यक गर्दी टाळली जाईल आणि यंदा विसर्जनाची मिरवणूही निघणार नाहीये. त्यामुळे मंडळांनी त्यांचं काम केलेय आणि खरी गरज आहे ती सामान्य नागरिकांनी अनाठायी उत्साह टाळण्याची. तसे झाले तरच करोनाचा पार्दुर्भाव कमी होऊ शकेल.

‘संपादकीय’ लिहणारे हे जेष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहेत. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER