अव्हॉईड करा कर ऐसी भाषा, बाकी बंदा अच्छा है तू! : विराट कोहलीला प्रशंसकाचा सल्ला

Virat-Kohli-

विराटच्या फलंदाजीमध्ये विशेष काहीच नाही. तो अवाजवी मोठा केला गेलेला फलंदाज आहे. या असल्या भारतीय फलंदाजांचा खेळ पाहण्यापेक्षा मला तरी इंग्लिश व अॉस्ट्रेलियन फलंदाजांचा खेळ बघण्यास मजा येते, अशी कडवट टिका करणाऱ्या एका क्रिकेटप्रेमीवर संताप व्यक्त करत त्याला देश सोडून जाण्याचा सल्ला देणाऱ्या विराट कोहलीवर सोशल मीडियात सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. विराटच्या प्रतिक्रियेने नाराज क्रिकेटप्रेमींनी त्याच्या परदेशातील लग्नापासून तो जाहिराती करत असलेल्या परदेशी कंपन्यांची त्याला आठवण करुन दिली आहे.

विराटने या टीकाकाराला उत्तर देताना म्हटले होते की, आमच्यापेक्षा आॕस्ट्रेलियन्स व इंग्लिश क्रिकेटपटू अधिक चांगले खेळतात असे वाटत असेल त्यांनी या देशात राहू नये. या देशात राहून तुम्ही परक्यांचे गुणगान कसे करू शकता? मी तुम्हाला आवडत नाही हे मी समजू शकतो परंतु तुम्ही माझ्या देशात राहून इतरांचे कौतुक करत असाल तर तुम्ही हा देश सोडून जायला हवे. तुमची पसंती काय ते आधी ठरवून घ्या.

विराटच्या या संतप्त प्रतिक्रियेत राजकारण प्रवेशाचाही वास काहींना आलाय.

यावर एका चाहत्याने प्रतिक्रिया दिलीय की,

Don’t live in India if instead of Indian football team you cheer for European league teams like Chelsea. Shameful.

विराट हा चेल्सी फूटबॉल क्लबचा प्रशंसक असल्याबद्दल अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दुसरा एक म्हणतो की मला अझहरुद्दीन आवडतो. तर मी या देशात राहू शकतो का?

I love azharuddin. Can I live in India @imVkohli

एकाला देशात राहण्याच्या सर्व अटी जाणून घेण्याची इच्छा झाली आहे. तो म्हणतो,
India me rahne ke liye jitne shart hain sab ek saath bata do.
idhar bahut confusion ho raha hai.

एकाने विराटच्या वक्तव्याचे विश्लेषण पुढीलप्रमाणे केले आहे.
He didn’t expected the results of his statement to get backfired. Him being loudmouth isn’t helping anymore. People are much smarter in choosing their icons these days. This is the difference between Sachin, Dravid, Ganguly and modern day cricketers.

एकाने तर आता विराटने त्याचा पासपोर्टच जमा करायला हवा असे सुचवले आहे. अनिवासी भारतीयांबद्दल विराटची भूमिका काय राहिल हे एकाला जाणून घ्यायचेय. त्याने म्हटलेय..

Wonder if he says the same to the NRIs who support him and the team when touring overseas?

देश सोडून जाण्यास सांगणारा हा कोण, असे विचारत एकाने

Who the hell is to ask someone to leave the country. He is an excellent captain, amazing captain but no King of Indian Republic अशी टीका केली आहे.

आमीरखान नावाच्या टीकाकाराला राजकीय हेतू दिसून आलाय. तो म्हणतो…

From an aspiring economist two years ago when he hailed demonetisation as a brilliant move, @ImKohli18 has become a political scientist. Defining citizenship now.

मनप्रीत चव्हाण यानेही अशीच शंका व्यक्त करताना

Janab Ko PM ji ki hawa lag Rahi hai shayad असे म्हटले आहे.

सुहेल नावाचा टीकाकार म्हणतो

Yesterday Gautam gambhir and now him.. already planning post retirement plans..Very simple to get Bjp tickets.

आणखी एक जण राजकारणाची शक्यता व्यक्त करताना म्हणतोय..

Sahi ja raha hai banda.
BJP mein bohut scope hai..
He knows how to lure bhakts.
@GautamGambhir
Use the resource ‘Nationalism’

लेमन मॕक्कार्थीला विराटने इटलीत केलेल्या लग्नाबद्दल आक्षेप आहे.

If you love India you should get married in Italy. याच मुद्द्यावर आर्यन नावाच्या एकाने म्हटलेय की, Don’t live in India if you love marrying in italy

इंदर छाबडा यांनी त्याच्या जाहिरातींचा संदर्भ देताना म्हटलेय की,

He is brand ambassador for Audi. He should go to Germany.

एकाने म्हटलेय की तुम्हाला भारतीय बनावटीच्या टाटा व महिंद्राच्या गाड्यांपेक्षा अॉडी आवडत असेल तर तुम्ही जर्मनीतच जायला हवं. अनिश तिवारीने तर त्याच्या फ्रान्समधून येणाऱ्या पिण्याच्या पाण्यावरही आक्षेप घेतलाय.

नवीन यादवने तर उपरोधीक इशाराच दिलाय, तो म्हणतो…

India me rehna hoga toh Kohli Kohli kehna hoga.

विराटच्या डोक्यात यशाची हवा गेल्याचे म्हणत एकाने रोहित शर्माला कर्णधार करण्याची मागणी केली आहे.

एकाने विराटला सावधानतेचा इशारा देत म्हटलेय की,

Today Indians they Cheer because you are performing bit well. Their are very good players better than you in india. The day you failed they threw some thing else on you. Match organizers don’t have right to remove public slippers and shoes in the stadium ok.

उपरोधात अलीम रहमान याने म्हटलेय की,

He @imVkohli has rights in his own way. He will boycott #IPL if any foreigners play in the team. He means business. He will take oath now.

हा ओव्हररेटेड नाही तर,ओव्हररिअॕक्टेड कोहली असल्याचे आनंद अग्रवाल यांनी म्हटले आहे. अमीत शेठ यांना मोदीभक्ती दिसून आली आहे. ते म्हणतात

This @imVkohli is dual personality like his baapu Modi jo kuch bhi woh karte hai sab kuch desh bhakti hoti hai hum kare to deshdrohi.. pata nahi yeh fekuji ko follow karnewale itne dramebaaz kyon ho jate hai. विराटची तुलना अलिया भटशीसुध्दा करण्यात आली आहे तर दांभिकतेची हद्द झाल्याचे एकाने म्हटले आहे. असे वक्तव्य करून विराट हा सेहवाग आणि गंभीर यांचा मोठा स्पर्धक बनला असल्याचे राजकीय सूचक वक्तव्य एकाने केले आहे.

एकाने विराटला सल्ला दिलाय तो असा….

I love u when u play cricket for india….but dont dictate what indian citizen should or shouldnt do…u dont have the right…..to do so…and a year ago filming a guy throwing garbage and recording that & posting was not right as well….dont do moral policing…@imVkohli
विराटने आता सुट्या घालवायलासुध्दा परदेशात जाऊ नये असे एकाटीकाकाराने म्हटले आहे.

विराटला परदेशातून हजारोंचे समर्थन लाभते. त्याकडे लक्ष वेधत निसार सय्यद याने म्हटलेय की,

Imagine the likes of Faf, Root & Smith saying same to indian descent SA, England or Aussie citizens waving indian flags at Lords, Jo’burg or sydney. @imVkohli gets so much support outside india coz indian descent citizens are free to support who they like. Grow a brain ffs Virat.

एकाने आयपीएलमधील परदेशी खेळाडूंचा मुद्दा उचललाय तो असा…

Dont live in India is you include & support foreign cricketers in your IPL team .

या टीकेच्या लाटेत कोहलीचे समर्थन करणारेही आहेत. त्यापैकी एकाचे मत आहे की,

He supports Indian National Football team, even promotes them personally. Part owns the FC Goa in ISL. Kam se kam thoda toh research karlo.