आॕलिम्पिकच्या तयारीसाठी अविनाश साबळे चार वर्षांपासून गावाकडे आलेलाच नाही..

Avinash Sable

मूळचा बीड (Beed) येथील लांब पल्ल्याचा धावपटू अविनाश साबळे (Avinash Sable) याने टोकियो आॕलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी आपली सराव व स्पर्धांची लय बिघडू नये म्हणून तो गेल्या चार वर्षांपासून गावाकडे आलेलाच नाही आणि टोकियो अॉलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलल्या गेल्याचा तो आपला दर्जा सुधारण्यासाठी उपयोग करुन घेत आहे, त्यामुळे आॕलिम्पिक पुढे ढकलले गेल्याचा आपल्याला फायदाच झाला असल्याचे त्याने म्हटले आहे आणि आपण आता टोकियोत केवळ सहभागासाठी नाही तर स्पर्धा करण्यासाठी जाऊ याची त्याला खात्री आहे.

दिल्ली हाफ मॕरेथाॕनमध्ये (Delhi Half Marathon) त्याने रविवारी एक तास 30 सेकंदाची (60.30 मिनीटे) वेळ नोंदवली. या वेळेसह तो दहाव्या स्थानी आला मात्र 61 मिनीटापेक्षा कमी वेळात हाफ मॕरेथाॕन पूर्ण करणारा तो पहिला धावपटू ठरला. अविनाश हा टोकियो आॕलिम्पिकसाठी 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये पात्र ठरला आहे. या स्पर्धेचाही राष्ट्रीय विक्रम साबळेच्या नावावर आहे.

या हाफ मॕरेथाॕनमध्ये साबळेपाठोपाठ भारतीय धावपटूंमध्ये श्रीनू बुगथा दुसऱ्या (1 तास 4 मिनीट 16 सेकंद) आणि दुर्गबहादूर तिसऱ्या (1 तास 4 मिनीट 19 सेकंद) स्थानी आला. इथिओपियाच्या अमेदेवर्क वालेलेन याने ही स्पर्धा 58 मिनीट 53 सेकंदाच्या वेळेसह जिंकली.

साबळेने 60.30 मिनीटाची वेळ देताना आधीचा राष्ट्रीय विक्रम तीन मिनीटांनी मागे टाकला. दिल्ली हाफ मॕरेथाॕनचा भारतीय धावपटूंचा विक्रमही त्याने चार मिनिटांनी सुधारला.

26 वर्षांच्या साबळे 2018 नंतर प्रथमच या स्पर्धेत धावला. 2018 मध्ये तो भारतीय धावपटूत दुसऱ्या स्थानी होता. मात्र यंदा कोरोनामुळे स्पर्धा व सरावाच्या अभावामुळे तो पुन्हा या स्पर्धेत सहभागी झाला.

या विक्रमाबद्दल तो म्हणाला की, नवा राष्ट्रीय विक्रमाचा आनंद आहेच. वर्षभरापासून मी कोणत्याही स्पर्धेत सहभागी नव्हतो. थोडाफार सराव सुरु होतो तेवढेच म्हणून मी संधी मिळाल्यावर मी सहभागी झालो आणि आंतरराष्ट्रीय धावपटूंच्या जास्तीत जास्त जवळ राहण्याचा प्रयत्न केला आणि त्यातमी यशस्वी झालो.

यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम 1 मिनीट 3.46 सेकंदाचा होता जो कालिदास हिरवेच्या नावावर होता तर दिल्ली मॕरेथाॕनचा विक्रम श्रीनू बुगथाच्या नावावर 1 मिनीट 4.33 सेकंदाच्या वेळेसह होता. यावेळी बुगथाने ती वेळ सुधारली.

दरम्यान, कोरोनामुळे टोकियो आॕलिम्पिक लांबणीवर पडले ही गोष्ट अविनाशसाठी लाभाचीच ठरली आहे. याचा आपल्याला फायदाच होणार असल्याचे त्याने म्हटले आहे. या वाढीव वेळेमुळे त्याने आपला क्षमता वाढविण्यावर जोर दिला आहे. टोकियो आॕलिम्पिकआधी सर्व प्रकारे तयारी करण्याचा निर्धार त्याने बोलून दाखवला आहे.आपली कितपत प्रगती झाली आहे हे पारखण्यासाठीच त्याने दिल्ली हाफ मॕरेथॉनमध्ये भाग घेतला होता. आॕलिम्पिकमधील यशाचे स्वप्न पाहणारा अविनाश गेल्या चार वर्षांपासून आपल्या गावाकडे (बीड) गेलेला नाही. सध्या तो दिल्लीत प्रशिक्षक अमरिशकुमार यांच्या मार्गदर्शनात कसून सराव करत आहे. आॕलिम्पिकनंतरच गावाकडे परतण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

लाॕकडाऊनमुळे विस्कळीत झालेल्या सरावाबद्दल तो म्हणतो की, सुरुवातीचे काही दिवस त्रास झाला. पण ही परिस्थिती लवकर सुधारणार नसल्याचे स्पष्ट होताच आपण पुन्हा सरावाला सुरुवात केली. गावाकडे यासाठी गेलो नाही की त्यामुळे खंड पडला की लय बिघडते आणि ती लय पुन्हा मिळवण्यास वेळ लागतो. म्हणून बंगळुरुमध्ये जेंव्हा केंव्हा वेळ मिळतो तेंव्हा मी सराव करतो.

आॕलिम्पिकबद्दल तो म्हणतो की, जागतिक पातळीवर आपण अजुनही बऱ्याच मागे आहोत पण आॕलिम्पिक वर्षभर पुढे ढकलल्याने मला सुधारणा करण्यास वेळ मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER