तुम्हाला तुमच सरकार लखलाभ, गदिमांच्या स्मारकाच्या दुर्दशेने अविनाश जाधवांचा संताप

Avinash Jadhav

सांगली : महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी अशी ओळख असलेले गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर यांच्या सांगलीतील स्मारकाची दुर्दशा झाली आहे. सांगलीतील शेतफळ नावाच्या गावात ग. दि. माडगूळकरांचे २००८ ते २००९ मध्ये स्मारक उभारले होते. या स्मारकातील खुर्च्या, दार, खिडक्या धूळखात पडल्या आहेत.

याबाबत मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी महाविकासआघाडीवर टीका केली. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हटले – “राज्य सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करुन ही वास्तू बनवली असेल, तर हे राजकीय नेते करतात काय? असा सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे. तसेच गदिमांची ही परिस्थिती असेल तर तुम्हाला तुमच सरकार लखलाभ,” असा टोमणा मारला.

नमस्कार मी अविनाश जाधव, मी सध्या सांगलीच्या दौऱ्यावर आहे. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. तिथून काही अंतरावर शेतफळे नावाचे गाव आहे. त्या ठिकाणी ग. दि. माडगूळकरांचा जन्म झाला. त्या जन्मभूमीत मी उभा आहे. त्या ठिकाणी माडगूळकरांचे २००८ मध्ये एक स्मारक उभारले. त्यावेळी निवडणुकीत घाईघाईत हे स्मारक उभं केल. त्याच उद्धाटन केले. २००८ – २००९ मध्ये हे स्मारक उभं राहिले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना देखीलही आमच्यावेळेच नाही, अस म्हणू शकत नाही. कारण ते दोघे आता सत्तेत आहेत. आपले राजकीय नेते मतांसाठी किती लोचट आहेत, त्याच एक उदाहरण म्हणून गदिमांच स्मारक कस पडल आहे हे तुम्हाला दाखवायच आहे.

गदिमांच्या या स्मारकात आंतरराष्ट्रीय दर्जाची अभ्यासिका उभी करण्यात येणार होती. मात्र काहीही झाले नाही. सरकारने हे ना कोणत्या ग्रामस्थांच्या ताब्यात दिल ना या ठिकाणी कोणी प्रशासकीय अधिकारी नेमला आहे. उद्धाटन करायच म्हणून ही वास्तू उभी केली! असा आरोपही अविनाश जाधव यांनी केला आहे.

गदिमांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. गदिमांचा फोटोही मनसेने दिलेला आहे. अशा अत्यंत वाईट स्थितीतली हि वस्तू करोडो रुपये खर्च करुन बंडाळी असेल तर राज्यात हे राजकीय नेते करतात काय? गदिमांची ही परिस्थिती असेल तर तुम्हाला तुमच सरकार लखलाभ, असा टोला अविनाश जाधव यांनी महाविकासआघाडी सरकारला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER