लोकलच्या सेवेसाठी ‘सविनय कायदेभंग’ करणारच – अविनाश जाधव

ठाणे : नागरिकांसाठी लोकल सुरू करा, या मागणीसाठी मनसेतर्फे उद्या ‘सविनय कायदेभंग’ आंदोलन करण्यात येणार आहे. यात ठाणे (Thane) शहरातील मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, असा दावा मनसेने (MNS) केला आहे. आंदोलन करू नका, यासाठी सरकारने मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) म्हणाले – सरकारला विरोध दर्शवला पाहिजे. या आंदोलनात ठाणेकरांनी भाग घ्यावा असे आवाहन आम्ही करतो. मी आंदोलनात सहभागी होणार आहे, ज्याला अडवायचे त्यांनी अडवावे, असे आव्हान त्यांनी दिले.

उद्या सकाळी ८.३० वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ठाणे शहरतर्फे हे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे आणि पदाधिकारी रेल्वेने प्रवास करतील. सकाळी ठाणे रेल्वेस्थानक येथून या आंदोलनास सुरुवात होईल. मनसेचे कार्यकर्ते ठाणे ते भांडूप प्रवास रेल्वेने करणार आहेत. इतर सेवा सुरू झाल्या, मग रेल्वे का नको? रेल्वे बंदच राहिली तर उदरनिर्वाह कसा चालणार, असा प्रश्न जाधव यांनी विचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER