अवीक सरकार पीटीआयचे नवे अध्यक्ष

aveek sarkar

नवी दिल्ली : इमेरिटसचे संपादक आणि आनंद बाजार प्रकाशन समूहाचे उपाध्यक्ष अवीक सरकार (Aveek Sarkar) यांची देशातील प्रमुख वृत्तसंस्था प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. सरकार (७५) यांच्या निवडीला पीटीआयच्या संचालक मंडळाने शनिवारी झालेल्या बैठकीत मान्यता दिली.

कोलकाता विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर सरकार यांनी पत्रकारिता क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी ब्रिटनमध्ये ‘द संडे टाईम्स’चे संपादक सर हॅरोल्ड इव्हान्स यांच्या मार्गदर्शनात काम केले. वृत्तपत्राच्या पानांची रचना याबाबत एडविन टेलर आणि वृत्त संपादन याबाबत त्यांनी इयान जॅक यांच्याकडून धडे घेतले.

‘आनंद बाझार’चे मुख्य संपादक म्हणून काम करताना सरकार यांनी त्या समूहाच्या बंगाली ‘आनंद बाजार पत्रिका’ आणि इंग्रजी ‘टेलिग्राफ’ चे स्वरूप बदलले. हा वृत्तपत्र समूह हिंदी एबीपी न्यूजसह विविध भाषांमध्ये ६ वृत्त वाहिन्या चालवत होता. याशिवाय अनेक नियतकालिकेही प्रकाशित करत होता.

सरकार पेंग्विन प्रकाशनाच्या ‘पेंग्विन इंडिया’चे संस्थापक व्यवस्थापकीय संचालक, बिझिनेस स्टँडर्डचे संस्थापक संपादक आहेत. २००३ ला एबीपी समूहाने ‘स्टार वृत्त समूहा’चे अधिग्रहण करण्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.

सरकार आणि विजय कुमार चोप्रा (पंजाब केसरी समूह) यांच्याशिवाय पीटीआयच्या बोर्डाचे सदस्य आहेत – विनीत जैन (टाईम्स ऑफ इंडिया), एन. रवी (द हिंदू), विवेक गोएंका (एक्सप्रेस ग्रुप), महेंद्र मोहन गुप्ता (दैनिक जागरण), के. एन. शांथ कुमार (डेक्कन हेराल्ड), रियाद मॅथ्यू (मलयाला मनोरमा), एम. व्ही. श्रेयम्सकुमार (मातृभूमी), आर. लक्ष्मीपती (दीनामलार), हार्मसजी एन कामा (बॉम्बे समाचार), प्रवीण सोमेश्वर (हिंदुस्तान टाईम्स), न्यायमूर्ती आर. सी. लाहोटी, दीपक नय्यर, श्याम सरन आणि जे. एफ. पोकखानवाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER