डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजला स्वायत्तता : आ. ऋतुराज पाटील

Patil Engineering College-Rituraj Patil

कोल्हापूर : गेल्या ३६ वर्षापासून उत्कृष्ट व गुणवत्तावपूर्ण शैक्षणिक परंपरेतून हजारो अभियंते घडवणाऱ्या कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीस ( D. Y. Patil Engineering College)नवी दिल्ली युजीसी आणि शिवाजी विद्यापीठ यांच्याकडून नुकताच स्वायत्त संस्थेचा दर्जा (ॲटॉनोमस इंस्टिट्युट) मिळाला आहे. या स्वायत्त महाविद्यालयातील चालू शैक्षणिक प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी व पदव्युत्तर पदवीचे प्रवेश महाराष्ट्र राज्याच्या केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेनुसार होणार असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील (Rituraj Patil) यांनी दिली.

आमदार पाटील म्हणाले, स्वायत्त दर्जामुळे महाविद्यालयाने स्वत:चा स्वतंत्र अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, गुणांकन पद्धती विकसित केली आहे. औद्योगिक मनुष्यबळाच्या मागणीनुसार सर्व अभ्यासक्रमाच्या उद्योजकीय अनुभव मिळावा यासाठी ५० पेक्षा जास्त उद्योजकांसोबत सामंजस्य करार केला आहे. महाविद्यालयातील सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना २ ते ४ महिने उद्योगामध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. स्टुडन्ट एक्स्चेंज सुविधेंतर्गत देशातील व राज्यातील नामांकित महाविद्यालयामध्ये एक सत्र शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल. त्यासाठी महाविद्यालयाने ४ नामांकित संस्थांबरोबर सामंज्यस्य करार केले आहेत.

कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, युजीसीने १० वर्षासाठी महाविद्यालयाला स्वायत्त संस्थेचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्र तंत्र शिक्षण संचालनालय यांनी या वर्षांपासून प्रथम वर्ष अभियांत्रिकी व एम.टेक. चे प्रवेश स्वायत्त संस्था म्हणून करण्यास महाविद्यालयाला परवानगी दिली आहे. आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रमला स्वायत्त संस्थेचा अभ्यासक्रमाचा दर्जा मिळवणारे हे राज्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे. प्रत्येकी ६० प्रवेश क्षमता असलेले बी. ई. कॉम्प्युटर सायन्स विथ स्पेशलायझेशन इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग व बी. ई. कॉम्प्युटर सायन्स विथ स्पेशलायझेशन इन डेटा सायन्स या दोन नव्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER