महापालिका कर्मचारी सोसायटीकडून आटोमॅटिक हँड सॅनिटायझर मशीन भेट : महापौरांच्या हस्ते उदघाटन

Automatic Hand Sanitizer Machine Gift from Municipal Employees Society

सांगली : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सांगली मिरज कुपवाड सिटी सॅलरी अर्नर्स कर्मचारी सोसायटीकडून सांगली महापालिका कार्यालयाच्या आवारात बसवण्यात आलेल्या आटोमॅटिक हँडसॅनिटायझर मशीनचे उदघाटन महापौर गीता सुयोग सुतार , उपमहापौर आनंदा देवमाने आणि उपायुक्त राजेंद्र तेली यांच्या हस्ते करण्यात आले.

कर्मचारी सोसायटीकडून यापूर्वीही महापुरात 5 लाखाची मदत करण्यात आली होती. याचबरोबर कोरोनाच्या या महामारीत सामाजिक बांधिलकी जपत महापालिका कर्मचारी सोसायटीकडून पाच ठिकाणी आटोमॅटिक हँड सॅनिटायझर मशीन बसवण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्व कार्यालयाच्या बाहेर पॅडल सॅनिटायझर मशीनही बसवण्यात आले आहे. या उपक्रमाबाबत सोसायटीच्या अध्यक्षासह संचालक सभासद यांचे महापौर सुतार यांनी कौतुक करीत आभार मानले.

यावेळी सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत आडके, उपाध्यक्ष पंकजा कोरे , संचालक सुवर्णा कांबळे, नकुल जकाते, सतीश सावंत, नितीनकाका शिंदे, माणिक गोंधळे, प्रमोद कांबळे, , राजू कदम, सुनील कुंभार, बंडा जोशी, विकास पाटील, सचिव बाळासाहेब माने, सचिन घाटगे, गिरीश पाठक, ठोमके आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला