एनआरसीच्या आडाने निरंकुश सत्तेचा डाव : जादेव अख्तर

Javed Akhtar

कोल्हापूर :- बहूतांश राज्यांनी एनआरसीला विरोध केला असतानाही ती राबविण्याचा संकल्प केला जात आहे, हा धोका ओळखा. एनआरसीच्या आडाने देशात निरंकुश सत्ता राबविण्याचा डाव आहे. युवकांनी तो उधळून लावण्याची सुरूवात केली आहे. ही सकारात्मक बाब असल्याचे मत कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी यावेळी व्यक्त केले.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त शाहू स्मारक येथे श्रमिक प्रतिष्ठानतर्फे जागर सभेचे आयोजन करण्यात आले होते. अख्तर यांनी ‘भारत नव्या स्वातंत्र्य लढ्याच्या उंबरठ्यावर’ या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी डॉ. तुषार गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जावेद अख्तर म्हणाले, देशातील युवक आज बेचैन आहे. ३६ विद्यापीठ खदखदत आहे. भाजप ही देशातील अनोखा पक्ष आहे जी आरआरएसची शाखा आहे. इतर राजकीय पक्षांच्या अनेक शाखा असताना मात्र भाजप हीच एक शाखा आहे. स्वातंत्र्यपूर्वी काळापासून आतापर्यंत मुस्लिम लिग आणि आरएसएस, हिंदू महासभा हे एकमेकाची भिती दाखवून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्नात होते. हे सगळे इंग्रजांचे एजंट होते. स्वातंत्र लढा टिपेला पोहचला असताना चलेजाव चळवळी विरोधात या दोघांनी काम केले. याचे बक्षीस म्हणून बॅरिस्टर जीना यांना पाकीस्तान मिळाला. आरएसएसच्या आडवे नेहरु-गांधी आले. याचा अजूनही यांच्या मनात राग आहे. ज्यांनी स्वातंत्र लढ्यापासून फारकत घेतली. तेच आता तुम्हा आम्हाला देशप्रेमाचे धडे देत आहेत. तुम्ही भारतीय आहात काय? म्हणून सवाल करीत आहेत.

खा. वारीस पठाण यांना फटकारले.

एमआयमचे खासदार वारीस पठाण यांनी १५ कोटी मुस्लिम बिथरले असल्याचे सांगितले, त्यांचा समाचार घेत जावेद अख्तर म्हणाले, बेवाकुफ,जाहिल…तू कोणाची नोकरी करत आहेस. एकत्र राहण्याच्या काळात अस बोलत असाल तर तुम्ही १५ करोडच राहाल. १५ करोड लोकांचा ठेका तुम्हाला कोणी दिला? आशा लोकांपासून सावध राहील पाहिजे. बॅ. जीना यांनी हिंदूपासून मुस्लिमांना धोका असल्याची आरोळी दिली. पाकीस्तानात तर कुठे मुस्मिल सुखी आहेत? त्याच्यासाठी जन्नत निर्माण करण्यात जीन यांन कोणी आडवले होते. हिंदू- मुस्लिमांना एकमेकाची भिती दाखवून राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रयत्न स्वातंत्रपूर्व काळापासून आजपर्यंत सुरु आहे.

जावेद अख्तर म्हणाले,

  • आएसएस आणि मुस्लिम लीग चा नेता स्वातंत्र्यलढ्यात अर्ध्या तासासाठीही जेलमध्ये गेला नाही.
  • स्वातंत्र्य चळवळीला तोडण्याच काम या दोघांनी पूर्ण शक्तीने केले.
  • हिटरला आदर्श मानता तर किमान त्याच्याप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था तरी सशक्त करा.
  • आपण सर्व शेतकऱ्यांचे वारसदार आहोत.
  • शेतकऱ्याप्रमाणेच आपल्याकडेही संकटे झेलण्याचा संयम आहे.
  • संकटे आली म्हणून शेतकरी तलवार घेवून रस्त्यावर उतरणार नाही, तो योग्य वेळेची वाट पाहतो.
  • औरंजेब बादशहाचे ५० वर्षांची सत्ता गेली आणि हे काय?
  • लॉ ऑफ युटीलिटी प्रमाणे बदलास सुरुवात झाली आहे.
  • मोदी आता थकल्यासारखे वाटतात नशीम अमित शहा त्यांच्या सोबत आहेत.