मुंबईतील एमएमआर रिजनमध्ये ऑटो रिक्षाचे भाडेवाढ

मुंबई : एमएमआर रिजनमध्ये (MMR Region) ऑटो (Auto) आणि टॅक्सीची (Taxi) भाडेवाढ होणार आहे. ऑटो रिक्षाचे भाडे १८ वरून २१ रुपयांवर, तर टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरुन २५ रुपये करण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय परिवहन आयुक्तांच्या बैठकीत घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढत आहेत. त्यामुळे ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालक आंदोलनाच्या पवित्र्यात होते. मात्र, भाडेवाढीचा निर्णय होत असल्याने त्यांना दिलासा मिळाला. मात्र, इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात प्रत्येकी ३ रुपयांनी वाढ झाली. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत झाले. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) या भाडेवाढीची घोषणा करणार आहे. दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. पेट्रोलने तर शंभरी गाठली आहे. अशावेळी रिक्षा आणि टॅक्सी संघटना भाडेवाढीची मागणी करत होते. मात्र त्यांना दिलासा मिळाला आहे. पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर आणि त्यात रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER