कोल्हापुरातील ऑटो गॅरेज हाउसफुल

Auto garage

कोल्हापूर :- महापुरामुळे शहरासह जिल्ह्यातील सुमारे 85 हजार वाहने पाण्याखाली गेली. या वाहनांच्या दुरुस्तीची लगबग आता सुरू झाली आहे. कंपन्यांची अधिकृत गॅरेज, दुचाकी मिस्त्री व शहरातील सुमारे 350 चार चाकी गाडी दुरुस्त करणारे गॅरेज च्या दारात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र आहे. विमा कंपन्यांकडून नुकसानीची तपासणी सुरू असून, जास्त नुकसान झालेल्या वाहनांना विमा पॉलिसीनुसार रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र विमा कंपन्यांकडून किती रक्कम मिळणार याबाबत वाहनधारक यांच्यात संभ्रमावस्था आहे.

ही बातमी पण वाचा : महावितरणचे कोल्हापुरातील महापुराने 70 कोटींचे नुकसान

महापुराने नद्यांच्या पाणी पातळीत चार व पाच ऑगस्टला अनपेक्षितपणे 12 फूट इतकीवाढ झाल्याने रात्रीत शहरातील वीस हजार घरे व वाहने पाण्याखाली गेली. स्वत:चा जीव वाचवण्याच्या घाईगडबडीत वाहने सुरक्षित स्थळी हलवता आली नाहीत. रमण मळा, नागाळा पार्क, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, सिद्धार्थनगर, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, जाधववाडी, कदमवाडी येथे हजारो वाहनांना जलसमाधी मिळाली. प्रयाग चिखली, आंबेवाडी, वडणगे यासह इचलकरंजी, शिरोळ, नृसिंहवाडी येथेही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी वाहने पूर्णत: बुडाली. आठवडाभर वाहने पाण्यात राहिल्याने इंजिनसह कोचिंगही खराब झाले. पाणी ओसरताच पुरातील वाहनांच्या दुरुस्तीची लगबग सुरू झाली आहे. पुरामुळे वाहनांचे स्टार्टर, क्लचप्लेट, वायरिंग, सेंसर खराब झाले आहेत. आठवडाभर वाहने पाण्यात राहिल्याने इंजिनसह कोचिंगही खराब झाले. कोल्हापुरातील बहुतांश सुहाने महापुरात अडकल्याने जुन्या गाड्यांचे मार्केट वर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.