आटो चालकाचे संशोधन; एकमेकांच्या संपर्कात न येता ४ प्रवासी बसू शकतात !

Anand Mahindra - Auto Video

नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीच्या काळात लोकांचा एकमेकांशी संपर्क टाळणे महत्त्वाचे आहे. या बंधनामुळे टँक्सी, आटोमध्ये प्रवास करणे अशक्य झाले आहे. एका आटोवाल्याने यावर नामी उपाय शोधला आहे. त्याने आटोत असा बदल केला आहे की, आटोत चालकाशिवाय चार प्रवासी (एकूण पाच) लोक एकमेकांच्या संर्पकात न येता बसू शकतात.

जग कोरोनाविरुद्ध लढण्यात गुंतले असताना चीन करतो आहे इतर देशांच्या हद्दीत घुसखोरी

‘महिंद्रा अँड महिंद्रा’चे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी त्या आटोवाल्याचे कौतुक करताना त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये लिहिले की, आपल्या देशात वेगाने नवीन शोधणे आणि नवीन संकटाचा सामना करण्याची क्षमता पाहून मी आश्चर्यचकीत झालो आहे.

महिंद्र अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटो अँड फार्म सेक्टरचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर यांना टॅग करत आनंद यांनी लिहिले की, आपण या व्यक्तीला आपल्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये सल्लागार म्हणून समावेश करण्याची गरज आहे!

ट्विट करण्यात आलेला व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप पसंत पडत आहे. अनेक लोक आता आपल्या आयडिया शेअर करीत आहेत.