जगाला हेवा वाटणारी सेटलमेंट करायची’ लेखकाची राज ठाकरेंवर टीका ; मनसे नेत्याचा समाचार

rupali thombre - Maharastra Today
rupali thombre - Maharastra Today

मुंबई : ‘जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट मला करायची आहे’ अशा शीर्षकाखाली लेखक घनश्याम पाटील (Ghanshyam Patil) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका करणारा ब्लॉग लिहिला आहे. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे .

पुण्यातील मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनीही फेसबुकवरुन घनश्याम पाटलांवर निशाणा साधला आहे . समाचार घेतला आहे. “घनश्याम तू लेखक म्हणून बिकावू तर आहेस पण माणूस म्हणून नीच आहेस” अशा शब्दाल रुपाली ठोंबरेंनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सातत्याने ज्या भूमिका बदलल्या, त्या पाहता या पक्षाच्या भवितव्याची काळजी वाटते.” अशा आशयाचा ब्लॉग ‘चपराक’चे संपादक आणि प्रकाशक घनश्याप पाटील यांनी लिहिला आहे.

काय आहे रुपाली पाटील यांची फेसबुक पोस्ट :

स्वतःला लेखक म्हणाऱ्या या बिकावू ,
स्वतःच स्टेलमेंट करून लेख लिहणाऱ्या लेखक म्हणाऱ्याचा तीव्र धिक्कार, निषेध
घनश्याम तू लेखक म्हणून बिकावू तर आहेस पण माणूस म्हणून नीच आहेस
आमच्या पक्ष अध्यक्ष मा. राज साहेब ठाकरे
बद्दल लिहायला तू एक सेटलमेंटचा पुरावा दे की
तुला कायदेशीर कारवाई तर करणार पण बिकावू लेखक म्हणून मनसे चोप पण देणार
अरे लेखक आहेस ना तू वास्तव्याचे प्रश्न समजत नसतील तर कसला आला रे लेखक
प्रसिद्धीसाठी कोणीही भुरटे लोक उठतात आणि स्वतःला लेखक म्हणून मानसिक रुग्णा सारखे लिहतात
घनश्याम तुझ्या माहितीसाठी कृष्णकुंज वर न्यायासाठी लोक येतात
कारण लोकांची आणि आमची विश्वासाची स्टेलमेंट झाली आहे
हे लक्षात ठेव
आणि तूच काढ पक्ष आणि चालवून दाखव (Rupali Patil Thombare on Ghanshyam Patil)
आमच्या साहेबांबद्दल लिहताना जरा वास्तव्याचे खरी परिस्थिती लिहिण्याचे धैर्यतुझ्या सारख्या स्वतःला लेखक म्हणाऱ्याकडे नाही
असो तू लेखक म्हणून छपरी आहेसच पण माणूस म्हणून तू बिकावू ,मानसिक रुग्ण आहेस.
आम्ही मनसे वास्तव्य आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जनतेच्या हिताचे राजकारण करणारा पक्ष आहे
उगीच नाही लोक प्रश्न घेऊन मा. राज साहेबांकडे येत
जय महाराष्ट्र
माझ्या बहिणींनो भावांनो नुसते वाचू नका या घनश्याम ला त्याची जागा दाखवून देऊ
की लेखक म्हणून तू छपरी ,बिकावू आहेस

स्वतःला लेखक म्हणाऱ्या या बिकावू ,
स्वतःच स्टेलमेंट करून लेख लिहणाऱ्या लेखक म्हणाऱ्याचा तीव्र धिक्कार, निषेध.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button