ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणतात, भारतातून परतणाऱ्यांना दंड वा तुरुंगवासाची चर्चा हास्यास्पद !

Australian PM Scott Morrison

कोरोना (Corona) संक्रमित भारतातून (India) परतणाऱ्यांना ऑस्ट्रेलियात (Australia) बंदी घालणाऱ्या ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) यांनी त्यांच्यावर प्रचंड आगपाखड करणारा समालोचक व माजी क्रिकेटपटू मायकेल स्लेटरच्या (Michael Slater) टीकेला उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटलेय की, भारतातून ऑस्ट्रेलियात परतणाऱ्यांना दंड केला जाण्याची वा जेलमध्ये टाकण्याची तरतूद केली असली तरी तसे केले जाण्याची शक्यता अगदीच कमी आहे. तो असमंजसपणा ठरेल हे स्पष्टच आहे असे मॉरिसन यांनी नाईन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियात कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून लोक सुरक्षितपणे घरी परतण्यासाठीचे हे उपाय आहेत. त्यात दंड किंवा तुरुंगवास होण्याच्या शक्यता जवळपास नाहीच, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याआधी मायकेल स्लेटरने या कठोर नियमांबद्दल पंतप्रधानांवर टीका करताना म्हटले होते की, तुमची हिंमतच कशी झाली आम्हाला अशी वागणूक देण्याची? जर आमच्या सरकारला आमची पर्वा असेल तर तुम्ही आम्हाला मायदेशी परतू द्याल. पंतप्रधान, तुमचे हात रक्ताळलेले आहेत. मी सरकारी परवानगीनेच आयपीएलसाठी आलो होतो आणि आता मला वाऱ्यावर सोडून दिले आहे, असेही स्लेटरने म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button