ऑस्ट्रेलियन ओपनच्या मानांकनावर त्रिमुर्तीचीच मक्तेदारी

Rafael Nadal-Novak Djokovic-Roger Federer
  • 13 वर्षात आठव्यांदा तिघांनाही पहिले तीन मानांकन
  • आठही वेळा त्यांच्यातलाच ठरला विजेता

मेलबोर्न: येत्या सोमवारपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी पुन्हा एकदा टेनिसवर वर्चस्व राखणारी त्रिमुर्ती, राफेल नदाल- नोव्हाक जोकोवीच- रॉजर फेडरर यांना पहिले तीन मानांकन मिळाले आहेत. गेल्या 13 वर्षात आठव्यांदा ही त्रिमुर्तीच पहिल्या तीन मानांकनात आहे आणि या आठही वेळा या तिघांपैकीच एक विजेता ठरला आहे. त्यामुळे यंदासुध्दा नदाल-जोको-फेडरर या तिघांपैकीच एखादा विजेता ठरला तर आश्चर्य वाटायला नको.

या मानांकनासंबंधीच्या नोंदी बघा

वर्ष मानांकन 1 मानांकन 2 मानांकन 3 विजेता
2008– फेडरर — नदाल — जोकोवीच — जोकोवीच
2009– नदाल —- फेडरर — जोकोवीच — नदाल
2010– फेडरर — नदाल — जोकोवीच — फेडरर
2011– नदाल —- फेडरर — जोकोवीच — जोकोवीच
2012– जोकोवीच- नदाल — फेडरर —— जोकोवीच
2015– जोकोवीच- फेडरर — नदाल —— जोकोवीच
2019– जोकोवीच- नदाल — फेडरर —– जोकोवीच
2020– नदाल — जोकोवीच – फेडरर —– ???

2013 मध्येही जोकोवीच व फेडरर हे अनुक्रमे पहिले दोन मानांकित खेळाडू होते. तिसरे मानांकन अँडी मरे याला होते. 2014 मध्ये नदाल व जोकोवीचनंतर फेरर तिसरा मानांकित होता. यावेळी फेडररला सहावे मानांकन होते. 2016 मध्ये जोकोवीच पहिला तर फेडरर तिसरा मानांकित होता. अँडी मरेला दुसरे मानांकन होते.2017 मध्ये पहिल्या तिघात एकटा जोकोवीच हाच एकमेव होता आणि त्याला दुसरे मानांकन होते. 2018 मध्ये ग्रिगोर दिमात्रोव्ह पहिल्या तिघा मानांकनात आला आणि जोकोवीच नव्हता.पण 2004 पासून प्रत्येक ऑस्ट्रेलियन ओपनवेळी या तिघांपैकी एकतरी पहिल्या तीन मानांकनांत कायम आहेच आहे.

2004 मध्ये रॉजर फेडररने आपल्या सहा पैकी पहिले ऑस्ट्रेलियन ओपन अजिंक्यपद पटकावले होते. तेंव्हापासून आतापर्यंत या त्रिमुर्तींव्यतिरिक्त इतर केवळ दोनच खेळाडू ही स्पर्धा जिंकली आहे. 2005 मध्ये मरात साफिन आणि 2014 मध्ये स्टॅन वावरिंका हा ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता ठरला होता.