ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अ‌ॅशली बार्टीला मिळालाय स्वप्नवत सोपा ‘ड्रॉ’

यंदाची पहिली ग्रँड स्लॕम टेनिस स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपनला (australian open) 8 तारखेपासून सुरुवात होत आहे आणि त्यासाठी पुरुष व महिला एकेरीचा ड्रॉ शुक्रवारी काढण्यात आला. त्यानुसार महिलांतील नंबर वन ऑस्ट्रेलियाची अ‌ॅशली बार्टी (Ashleigh Barty) हिला स्वप्नवत ड्रॉ मिळाला आहे. तिचा उपांत्य फेरीपर्यंतचा मार्ग तसा सोपाच आहे. नवव्या आॕस्ट्रेलियन ओपन विजेतेपदाच्या मार्गावर असलेल्या नोव्हाक जोकोवीचची (Novak Djokovic) सुरुवात जेरेमी चार्डीशी होणार असून दुसऱ्या फेरीत फ्रान्सिस टिफोशी त्याचा सामना होऊ शकतो.

अ‌ॅश बार्टीच्या गटात एकही आघाडीची खेळाडू नाही. मेलबोर्न येथे गेल्या चार वर्षात पहिली फेरी पार न करु शकलेली दान्का कोव्हिनीक ही तिची पहिली प्रतिस्पर्धी असेल. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचीच दारिया गाव्रिलोव्हा, एकाटेरीना अॕलेक्झांद्रोव्हा, पेत्रा मार्टीक, कॕरोलिना प्लिस्कोव्हा यांच्याशी तिचे सामने होतील असा अंदाज आहे. त्यानंतर उपांत्य फेरीत सोफिया केनिन ही खऱ्या अर्थाने पहिली तगडी प्रतिस्पर्धी तिच्यासमोर असेल.

सिमोना हालेप, सेरेना विल्यम्स, नाओमी ओसाका, गर्बाईन मुगुरुझा ह्या सर्व तगड्या खेळाडू दुसऱ्या गटात आहेत. त्यामुळे अॕश बार्टीला अगदी स्वप्नवत ड्रॉ मिळाला असल्याचे मानले जात आहे.

पुरुषांमधील आघाडीचा ऑस्ट्रेलियन खेळाडू नीक किरयोस याचेही सुरुवातीचे सामने सोपे राहण्याचा अंदाजआहे. त्याचा पहिला सामना पात्रता स्पर्धेतुन आलेला फ्रेडरिको फरेराशी आहे. त्यानंतर युगो हंबर्टशी त्याचा सामना होऊ शकतो. तिसऱ्या फेरीत मात्र डॉमिनीक थीमसारख्या तगड्या खेळाडूचा त्याला सामना करायाचा आहे.

अलेक्स डी मिनौरला पहिलाच सामना टेनिस सँडग्रेनशी खेळायचा असून चौथ्या फेरीपर्यंत पोहोचला तर राफेल नदाल हा त्याचा प्रतिस्पर्धी असेल.

नोव्हाक जोकोवीच, अॕलेक्झांडर झ्वेरैव्ह व डाॕमिनीक थीम हे एकाच बाजूला असल्याने त्यांचा गट स्पर्धात्मक आहे. राफेल नदाल व दानिल मेद्वेदेव हे दुसऱ्या बाजूच्या ड्रॉमध्ये आहेत.नदालचा सलामी सामना लास्लो जेरेशी होईल. त्यानंतर व्हिक्टर ट्रोईकी किंवा मायकेल एममोहशी त्याची लढत होईल.

पहिल्या फेरीचे काही लक्षवेधी सामने

पुरुष एकेरी
नोव्हाक जोकोवीच वि. जेरेमी चार्डी
ग्रिगोर दिमित्रोव्ह वि. मारिन सिलीच
केई निशीकोरी वि. पाब्लो कॕरेनो बस्टा
डेनिस शापोव्हालोव्ह वि. यान्निक सिनर
स्टेफानोस सीसीपास वि. गील्स सायमन

महिला एकेरी
युलीया पुतीनत्सेवा वि. स्लोन स्टिफन्स
अॕनास्तेशिया पावलीचेंकोव्हा वि. नाओमी ओसाका
सेरेना विल्यम्स वि. लाॕरा सिगमंड
स्वेतलाना कुझ्नेत्सेवा वि. बार्बोरा स्ट्रायकोव्हा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER