आॕस्ट्रेलियन क्रिकेटपटूने दिला भारतीय क्रिकेटपटूंना धडा, कोरोना लढाईसाठी दिली 50 हजार डॉलरची मदत

Pat Cummins - Maharastra Today

सबंध भारतावर कोरोना (Corona) संकट गडद होत असताना आयपीएलचे (IPL) क्रिकेट सामने सुरू आहेत आणि त्याला वाढता विरोध आहे. क्रिकेट मंडळ आणि भारतीय क्रिकेटपटू कोरोना संकटात मदतीसाठी कोणत्याही प्रकारे पुढे येत नसल्याने नाराजी वाढत आहे. या परिस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) संघातील अष्टपैलू खेळाडू पॕटरसन कमिन्स (Patterson Cummins) याने भारतातील दवाखान्यांना आॕक्सिजन पुरवठ्याची साधने घेता यावीत यासाठी 50 हजार डॉलरची देणगी दिली आहे.

त्याच्या या दानशूरतेने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटपटूंची उदासिनता, आयपीएल आणि कोरोना लाट हा विषय चर्चेत आला आहे. कमिन्सने ही देणगी पंतप्रधान मदतनिधी, पीएम केयर्सला (PM Cares fund) दिली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये अशी देणगी जाहिररित्या देणारा तो पहिलाच खेळाडू आहे. ही देणगी ट्विटरद्वारे जाहीर करताना त्याने सहकारी खेळाडूंनाही याप्रकारे मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

सद्यस्थितीत आयपीएल खेळणे योग्य की अयोग्य अशी चर्चा सुरू असताना मला असे सांगण्यात आले की, देशभरातील जनता लॉकडाऊनमध्ये असताना आयपीएलच्या सामन्यांमुळे त्यांना काही काळ दिलासा व आनंद मिळतो. खेळाडू म्हणून आम्ही सुदैवी आहोत की आम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी होऊ शकतो. हे ध्यानात ठेवून मी पीएम केयर्स फंडला हे योगदान देत आहे, त्याचा उपयोग भारतातील इस्पितळांमध्ये आॕक्सिजन सुविधांसाठी करण्यात यावा असे पॕटरसन कमिन्सने आपल्या संदेशात म्हटले आहे.

कमिन्सला गेल्या वर्षी केकेआरने 15 कोटी 50 लाख रुपये मोजून आपल्या संघात घेतले होते.

कमिन्सने आपल्या संदेशात पुढे म्हटले आहे की, माझे सहकारी आयपीएल खेळाडू आणि भारतीयांचे प्रेम व दानशूरतेची ज्यांना जाणीव असेल, अशा सर्वांनी अशी मदत करायला हवी. त्याची सुरुवात मी 50 हजार डॉलरच्या देणगीपासून करत आहे. अशा वेळी असहाय्य वाटणे स्वाभावीक आहे. मलाही अलीकडे तसेच वाटू लागले होते. पण आता ह्या जाहीर आवाहनाने आम्ही भावनांना कृतीची जोड देवू शकतो. त्याच्याने लोकांच्या आयुष्यातील अंधकार दूर होण्यास मदत होईल. माझी ही मदत काही फार मोठी नाही पण ती कुणाच्या तरी आयुष्यात बदल घडवेल अशी आशा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button