ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कारांत

पॕट कमिन्स व अॕलिसा हिलीची बाजी

Australian Cricket Awards

मेलबोर्न: ऑस्ट्लियाच्या वार्षिक क्रिकेट पुरस्कारांमध्ये पॕट कमिन्स याला मानाच्या ए.बी. पदक तर अॕलिसा हिली हिला बेलिंडा क्लार्क पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अॕलिसा हिली हिला वन डे इंटरनॅशनल आणि टी-२० इंटरनॅशनलमधील वर्षातील सर्वोत्तम ऑस्ट्लियन खेळाडूसुध्दा घोषित करण्यात आले.

यष्टीरक्षक अॕलिसासाठी गेले वर्ष सातत्यपूर्ण कामगिरीने स्मरणीय राहिले. गेल्या मार्चमध्ये तिने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा गाजवली. त्या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा किताब मिळवताना तिने ५६.२५ च्या सरासरीने २२५ धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्येही तिने सहा सामन्यात ३२९ धावा केल्या.

अॕलन बोर्डर पदकाने सन्मानित पॕट कमिन्सने तिन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी केली. कसोटी सामन्यांमध्ये गेल्या वर्षभरात त्याने ८ सामन्यात ३६ बळी आपल्या नावावर लावले. अलीकडेच श्रीलंकेविरुध्दच्या दुसऱ्या कसोटीत त्याने ६२ धावात १० बळींची कामगिरी नोंदवली.
ऑस्ट्
नेथन लायन कसोटी क्रिकेटचा प्लेयर ऑफ द इयर ठरला. त्याने पुरस्कार कालावधीच्या वर्षभरात ४८ बळी मिळवले. वन डेमध्ये मार्कस् स्टोईनीस हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ऑफ द इयर ठरला. त्याने १३ सामन्यात ३७६ धावा तर केल्याच शिवाय १३ बळी मिळवून अष्टपैलू चमक दाखवली.

ग्लेन मॕक्सवेल २०१५ नंतर पुन्हा एकदा टी-२० आंतरराष्ट्रीय मधील ऑस्ट्रेलियन प्लेयर आॕफ द इयर ठरला.

अॉस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कार २०१९ चे विजेते पुढीलप्रमाणे

  • १) अॕलन बोर्डर पदक- पॕट कमिन्स
  • २) बेलिंडा क्लार्क पुरस्कार- अॕलिसा हिली
  • ३) कसोटी क्रिकेटचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू- नेथन लायन
  • ४)एकदिवसीय क्रिकेटचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू (पुरुष)- मार्कस स्टोईनीस
  • ५) एकदिवसीय क्रिकेटची वर्षातील सर्वोत्तम खेळाडू (महिला) – अॕलिसा हिली
  • ६) टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू- ग्लेन मॕक्सवेल व अॉलिसा हिली.
  • ७) बेटी विल्सन प्रतिभावान उदयोन्मुख क्रिकेटपटू (महिला)- जॉर्जिया वेअरहॕम
  • ८) ब्रॕडमन प्रतिभावान युवा क्रिकेटपटू पुरस्कार- विल पुकोव्हस्की
  • ९) सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू (देशांतर्गत क्रिकेट)- मॕथ्यू वेड आणि हिथर ग्रॕहम
  • १०) समाजसेवा (कम्युनिटी) चॕम्पियन पुरस्कार- मोझेस हेन्रीक्स