मधली फळी गडगडल्याने ऑस्ट्रेलियाने हातचा सामना गमावला

T-20 England Australia

इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) दरम्यानचा शुक्रवारचा टी-20 (T- 20 cricket) सामना अतिशय नाट्यमय ठरला. ऑस्ट्रेलियाने 35 चेंडूत 39 धावा आणि हाताशी नऊ गडी असताना हा सामना गमावला आणि इंग्लंडने फक्त दोन धावांनी अनपेक्षित विजय मिळवला. इंग्लंडच्या 7 बाद 162 धावांच्या उत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव 6 बाद 160 धावांवर मर्यादीत राहिला. अखेरच्या षटकात 15 धावा हव्या असताना मार्कस् स्टोईनीस त्या करु शकला नाही.

साउथम्पटन येथील या सामन्याचे फक्त दोनच चेंडूत वर्णन करता येईल. इंग्लंडच्या डावातील शेवटच्या चेंडूवर ख्रिस जॉर्डनने पॅट कमिन्सला चौकार हाणला तर ऑस्ट्रेलियाच्या डावातील शेवटच्या चेंडूवर स्टोईनीस फक्त दोनच धावा घेऊ शकला. याच फरकाने सामन्याचा निकाल लावला.

Ashton Agar is run out by Chris Jordan.

डेव्हिड वॉर्नर (58) व आरोन फिंच (46) यांनी ऑस्ट्रेलियाला 11 षटकात 98 धावांची सलामी दिली. 15 व्या षटकात स्टिव्ह स्मिथ बाद झाला त्यावेळी त्यांना 34 चेंडूत 39 धावांची गरज होती आणि आठ गडी हाती होते. तरी ते सामना जिंकू शकले नाही. त्यानंतरच्या षटकात आदिल रशीदने स्टिव्ह स्मिथ व ग्लेन मॅक्सवेलला बाद करुन पडझड सुरु केली.

या पराभवाची जबाबदारी आरोन फींच व डेव्हिड वॉर्नर यांनी आपली असल्याचे म्हटले आहे. आपण संघाला विजयापर्यंत पोहचवू शकलो नाही याचा दोष त्यांनी स्वतःला दिला आहे.

ऑस्ट्रेलियाला अखेरच्या सहा षटकात फक्त एकदाच चेंडू सीमापार करता आला. टॉम करनला स्टोईनीसने षटकार खेचला पण त्यानंतरच्या चार चेंडूत त्यांना नऊ धावा जमवता आल्या नाहीत.

याच्याआधीच्या टी-20 सामन्यातही दक्षिण आफ्रिकेविरुध्द ऑस्ट्रेलियन संघ असाच गडगडला होता. त्यावेळीसुध्दा 13 षटकात एक बाद 98 धावा असताना ते 160 धावांचे लक्ष्य गाठू शकले नव्हते. त्यावेळी डेव्हिड वॉर्नर खेळपट्टीवर असूनही काही करू शकला नव्हता.

इंग्लंडचा कर्णधार इयानमार्गनने विजयाचे श्रेय आपल्या गोलंदाजांना दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER