ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक जस्टिन लँगरने शिकला धडा, ‘आता टीम इंडियाला कधी हलक्यात नाही घेऊ’

Justin Langer - Team India

टीम इंडियाने (Team India) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) मध्ये जे विजय मिळवले आहे ती भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात सदैव जिवंत राहील, परंतु ऑस्ट्रेलियाच्या (Australia) संघाला ज्या जखमा मिळाल्या आहेत ते कांगारू आयुष्यभर विसरणार नाहीत.

टीम इंडियन्सने सर्वांना आश्चर्यचकित करत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पुन्हा एकदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली. या मालिकेपूर्वी कोणालाही अशी कामगिरी अपेक्षित नव्हती, परंतु निकाल असा होता की तो शतकानुशतके लक्षात राहील. ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक लॅंगरलाही भारताच्या कामगिरीने चकित आहे.

फिटनेसच्या समस्येने झुंजणाऱ्या युवा भारतीय संघाकडून कसोटी मालिका गमावल्यानंतर नाखूष ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक जस्टिन लँगर म्हणाकि की, भारतीय संघाला कधीही कमी लेखू नये, या धक्क्यातून मी एक मोठा धडा शिकला आहे. चौथ्या कसोटी सामन्यानंतर भारताने मालिका २-१ ने जिंकली.

लॅंगर म्हणाला, ‘ही एक चांगली कसोटी मालिका होती. शेवटी एक हरतो आणि एक जिंकतो. आज कसोटी क्रिकेट जिंकला आहे. हा पराभव आम्हाला दीर्घकाळ त्रास देईल. संपूर्ण श्रेय टीम इंडियाला जाते. आम्ही त्यातून धडा घेतला आहे.’

तो म्हणाला, ‘पहिली गोष्ट म्हणजे कधीही कोणाला हलक्यात घेऊ नका आणि दुसरे म्हणजे कधीही भारतीयांना कमी लेखू नये. दीड अब्ज लोकसंख्येची भारताची लोकसंख्या आहे आणि जर तुम्ही या खेळाच्या प्लेइंग XIमध्ये असाल तर तुम्ही खरोखर एक चांगले आणि मजबूत खेळाडू असाल.’

जस्टीन लँगर म्हणाला, एडिलेडमध्ये ३६ धावांवर बाद झाल्यानंतर भारताची पुनरागमन प्रेक्षणीय होते, विशेषत: जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या मोठ्या खेळाडूंना दुखापत झाल्यानंतरही. तो म्हणाला, ‘भारतीय संघाची जितकी प्रशंसा केली तितकी कमी आहे. ३ दिवसांत पहिला सामना गमावल्यानंतरही त्याने हार मानली नाही आणि शानदार पुनरागमन केले. आम्हाला एक मोठा धडा मिळाला आहे आणि आम्ही कधीच भारताला हलक्यात घेणार नाही.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER