उंदीर मारण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारताकडे मागितले ५ हजार लिटर विष!

Maharashtra Today

सिडनी : जगात सध्या कोविड – १९ च्या साथीचा उद्रेक सुरू असताना ऑस्ट्रेलियामध्ये उंदरांमुळे दहशत निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियात उंदरांची संख्या बेसुमार वाढली आहे. तिथे Biblical Plague जाहीर करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने उंदीर मारण्यासाठी भारताकडे ५ हजार लिटर ‘ब्रॉमेडीओलोन’ विष(5,000 liters of poison to kill rats) मागितले आहे.

उंदरांच्या उपद्रवामुळे ऑस्ट्रेलियातील शेतकरी आणि जनता त्रस्त झाले आहेत. उंदीर शेतातील पीक आणि साठवलेले धान्य फस्त करत आहेत. परिस्थिती इतकी भंयकर आहे की घरांमध्ये अंथरुणातही उंदीर झाले आहेत. उंदीर चावल्याच्या तक्रारी येत आहेत. एका घराला आग लागली त्याबाबत घरमालकाने आरोप केला की उंदरांनी विजेची वायर कुरतडल्याने शॉट सर्किट होऊन घराला आग लागली. उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

आर्थिक आणि सामाजिक संकटाचा धोका

उंदरांच्या उपद्रवाबाबत कृषिमंत्री अ‍ॅडम मार्शल म्हणालात की, आम्ही सध्या एका गंभीर समस्येचा सामना करत आहोत. लवकरात लवकर उंदरांची संख्या कमी केली नाही तर ग्रामीण आणि न्यू साउथ वेल्समध्ये आम्हाला आर्थिक आणि सामाजिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. न्यू साउथ वेल्स राज्याच्या सरकारने या घटनेचे अभूतपूर्व असे वर्णन केले आहे.

आजार

उंदीर सर्वत्र – शेतात, घरे, छतावर, शाळा आणि रुग्णालयांना फर्निचरमध्ये आढळत आहेत. यामुळे लोक त्रस्त आहेत. बरेच लोक उंदरांमुळे होणाऱ्या आजारांना बळी पडत असल्याच्या बातम्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button