आयुर्वेदिक डॉक्टरांनाही सर्जरी करण्याची परवानगी; अधिसूचना जारी

Doctors

नवी दिल्ली : केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, आता आयुर्वेदिक डॉक्टर्सही शस्त्रक्रिया करू शकणार आहेत. सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, आयुर्वेदातील पीजी विद्यार्थ्यांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आयुर्वेदिक डॉक्टर्स हाडांचे आजार, डोळ्यांचे विकार, नाक-कान-घसा आणि दातांशी निगडित शस्त्रक्रिया करू शकणार आहेत.

सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या अध्यक्षांनी सांगितलं की, आयुर्वेदाच्या संस्थानांमध्ये अशा सर्जरी गेल्या २५ वर्षांपासून केल्या जात आहेत. अधिसूचनेत केवळ हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, अशा शस्त्रक्रिया करणं वैध असणार आहे. केंद्र सरकारने १९ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली. आयुर्वेदाच्या पीजी अभ्यासात आता शस्त्रक्रियांचा अभ्यासक्रमही जोडण्यात येणार आहे.

त्याचसोबत कायद्याचे नाव बदलून ‘भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद संशोधन विनियम, २०२०’ ठेवण्यात आले आहे. आयुर्वेदात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांच्यावतीने बऱ्याच काळापासून अॅलोपॅथीप्रमाणे अधिकार देण्याची मागणी करण्यात येत होती. नव्या अधिसूचनेनुसार, आता आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासादरम्यान, शस्त्रक्रिया करण्याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

यामुळे आयुर्वेदाच्या डॉक्टर्समध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर इंडियन मेडिकल असोसिएशनचे मत मात्र वेगळे आहे. आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा म्हणाले, यामुळे डॉक्टरांमध्ये खिचडीसारखी परिस्थिती निर्माण होईल. देशात संमिश्र परिस्थितीमुळे हायब्रिड डॉक्टरांना प्रोत्साहन मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER