‘औरंगजेब सेक्युलर नव्हता !’ उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला सुनावले

CM Uddhav Thackeray

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ उल्लेख आल्यानंतर काँग्रेसने त्याला आक्षेप घेतला. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला सुनावले – संभाजीनगर असा ट्विटर हँडलमध्ये उल्लेख केला तर त्यात नवीन काय आहे? औरंगजेब हा सेक्युलर नव्हता. आघाडीच्या अजेंड्यात ‘सेक्युलर’ हा शब्द असून त्यात औरंगजेब बसत नाही. (cm uddhav thackeray slams congress over aurangabad rename issue)

वसंत गीते आणि सुनील बागुल या नाशिकमधील नेत्यांनी भाजपा सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज संध्याकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या दोन्ही नेत्यांनी हाती शिवबंधन बांधले. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला फटकारले. राज्यात आघाडीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे काँग्रेसला फटकारले आहे. तुमच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

या प्रश्नाच्या उत्तरात ठाकरे म्हणालेत – त्यात नवीन काय केले? जे वर्षानुवर्षे बोलतोय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो उल्लेख केला, तेच ट्विटरवर आहे. औरंगजेब काही सेक्युलर नव्हता. आमच्या अजेंड्यात सेक्युलर शब्द आहे. त्यात औरंगजेब बसत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER