औरंगजेबाला स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे, तर चंद्रकांत पाटलांना अजित पवारच दिसतात : राष्ट्रवादीची टीका

Amol Mitkari - Ajit Pawar - Chandrakant Patil - Maharashtra Today

मुंबई : भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे गेल्या अनेक दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधत आहे . यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पाटील याच्यावर पलटवार केला आहे .

औरंगजेबाला ज्याप्रमाणे स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे. त्याप्रमाणेच चंद्रकांत पाटील यांना स्वप्नात केवळ अजित पवारच दिसतात, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. पाण्याविना मासे तडफडतात तशी राज्यातील भाजप नेत्यांची अवस्था आहे. मात्र, त्यांनी उगाच सत्तेची स्वप्न पाहू नयेत. राज्यात पुढील 15 वर्षे महाविकासआघाडीची सत्ता असेल, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले होते. सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना की झोपेत केलं होतं, असा प्रश्न अजितदादांनी विचारला. यावर चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना चांगलेच सुनावले आहे. त्यामुळे सध्या अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button