CMO च्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख; नामांतराचा मुद्दा पेटणार?

CM Uddhav Thackeray

मुंबई :   राज्याच्या राजकारणात सध्या औरंगाबाद नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यातच आता मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर ( CMO’s Twitter) अकाउंटवर संभाजीनगर (Sambhajinagar) असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे नामांतराचा हा मुद्दा फडका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. औरंगाबाद शहराचे ‘संभाजीनगर’ असे नामकरण करा, अशी शिवसेनेची गेल्या कित्येक वर्षांपासूनची भूमिका आहे.

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आता तोंडावर आल्याने भाजप आणि मनसेकडून शिवसेनेच्या याच भूमिकेवरून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. राज्यात शिवसेना सत्तेत असताना औरंगाबाद शहराचं नामकरण का झालं नाही? असा सवाल करत भाजप आणि मनसेने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तर काँग्रेसने संभाजीनगर नामकरणाला विरोध दर्शवला आहे. नामांतराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षांमध्येच एकमत नसल्याने विविध चर्चांना उधाण आलं होतं. या सर्व घडामोडी ताज्या असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ‘संभाजीनगर’ असा उल्लेख करण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ही बातमी पण वाचा :औरंगाबाद नामांतरावर शिवसेना ठाम, आता विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव द्या; मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER