औरंगाबादचे नामांतर पेटले, थोरातांच्या फोटोला मारले जोडे

Aurangabad - Sambhajinagar - Balasaheb Thorat

औरंगाबाद :- अनेक वर्षांपासून शिवसेना (Shiv Sena) औरंगाबादचे (Aurangabad) नामांतर करण्याच्या प्रयत्नात आहे. औरंगाबाद हे नाव बदलून संभाजीनगर (Sambhajinagar) असे करण्यासाठी शिवसेना महत्त्वाकांक्षी आहे. मात्र, आजपर्यंत अनेक कारणाने हा विषय अडखला आहे. आता राज्यात तीन विरुद्ध विचाराच्या पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे या मुद्दयावरून शिवसेना आणि सहकारी पक्ष कॉंग्रेसमध्ये मतभेद सुरू आहेत. त्यातच आता मराठा क्रांती ठोक मोर्चाने नामांतरावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

नुकताच कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी या नामांतराला प्रखर विरोध दर्शवला आहे. या मुद्दयावरून मराठा क्रांती ठोक मोर्चाने आक्रमक पाऊल उचलत थोरातांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी केली. मात्र या प्रस्तावाला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात विरोध दर्शविला. याचा मराठा आंदोलकांनी निषेध केला. आंदोलकांनी बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमेला जोडे मारत तो फाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले.

काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात?

राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नाव बदल हा आमचा कार्यक्रम नाही. नाव बदल आणि अशा प्रकारच्या गोष्टींना आमचा विरोध राहील, असं थोरात म्हणाले. औरंगाबादच्या नामांतराचा वाद पुन्हा एकदा पुढं आला असताना बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती.

तर ठाकरे सरकारला (Thackeray Government) धोका, निरुपमांचा ‘औरंगाबाद’वर इशारा

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. शिवसेनेने राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे आहे, हे लक्षात ठेवावे असे त्यांनी म्हटले. औरंगाबादचे नामांतर हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. मात्र, आता राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. युतीचे सरकार हे वैयक्तिक अजेंड्यावर नव्हे कॉमन मिनिमम प्रोगामच्या आधारे चालते. हा कॉमन मिनिमम प्रोगाम काम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे, नाव बदलण्यासाठी नाही, असा टोला संजय निरुपम यांनी शिवसेनेला लगावला.

‘काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का?’

औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करणे हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही. हा मुद्दा निवडणुकीचा नव्हे तर भावनिक मुद्दा आहे. काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला? ते आधी हटवा, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

ही बातमी पण वाचा : औरंगाबादमध्ये पुढचा महापौर काँग्रेसचाच, थोरातांचे शिवसेनेला थेट आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER