औरंगाबादचे नामांतर होणार? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

Eknath Shinde

सोलापूर : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी औरंगाबादचे नामांतर होणारच असे स्पष्ट सांगितल्यानंतर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी, संभाजीनगर हा स्थानिकांच्या अस्मितेचा विषय आहे. सरकार तिथल्या भावनांचा आदर करणार, असे सूचक विधान केले. (eknath shinde reaction on aurangabad renamed)

एकनाथ शिंदे आज सोलापूरमध्ये होते. औरंगाबादच्या नामांतराबाबत पत्रकारांशी बोलताना म्हणालेत, संभाजीनगर हा तिथल्या स्थानिकांच्या अस्मितेचा विषय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादचा नामोल्लेख ‘संभाजीनगर’च केला जातो. त्यामुळे सरकार तिथल्या लोकांच्या भावनांचा आदर करेल. जे लोकांना हवे आहे, तोच निर्णय सरकार घेणार. नामांतराचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणण्याबाबत मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेतेच निर्णय घेतील. औरंगजेबाबाबत कुणाचं प्रेम असण्याचे काहीही कारण नाही.

आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबादेत कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते म्हणालेत, दुसरे पक्ष संभाजीनगरबद्दल विचारत असतात. पण, त्यांनी पाच वर्षे केले? औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करणार का?; असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता आदित्य ठाकरेंनी सूचक विधान केले. पुढे पाहा काय होतंय..! महाविकास आघाडीचे एकमत करूनच आम्ही शहराचं नाव बदलू, पण त्यासोबतच शहराच्या विकासाचे प्रश्नही सोडवत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER