औरंगाबाद नामांतर : आघाडीतील विरोधाभासावर निघेल तोडगा – अजित पवार

Ajit Pawar

नाशिक : औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीत विरोधाभास आहे हे उघड झाले. यावर पत्रपरिषदेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणालेत की, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करने हा शिवसेनेचा (Shiv Sena) पहिल्यापासूनचा प्रमुख अजेंडा आहे. मात्र, शहरांची नाव बदलून विकास होत नाही, अशी काँग्रेसची भूमिका असल्याने त्यांचा याला विरोध आहे. यावर शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) हे एकत्र बसून मार्ग काढतील.

अजित पवार म्हणाले, औरंगाबादच्या नामांतरावरुन निर्माण झालेल्या वादावर आमच्या तिन्ही पक्षांचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी हे एकत्र बसून मार्ग काढतील. मात्र, यामध्ये काही लोक जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) अंतर पडावे यासाठी प्रयत्न करत आहेत. आघाडीतील तिनही पक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरता एकत्र आलेले आहेत. यासाठी आम्ही समान कार्यक्रम आखलेला आहे. तो कार्यक्रम राबवत असताना त्यामध्ये कधीतरी असा प्रसंग येतो आणि त्यातून आम्ही समोपचाराने मार्ग काढू.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER