औरंगाबादचे नामांतरण : चंद्रकांत खैरेंनी केला काँग्रेस, राष्ट्रवादीचा बचाव

Chandrakant Khaire

औरंगाबाद : काँग्रेस, मनसे आणि भाजपाने औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, शिवसेनेला कुणीही कोंडीत पकडू शकत नाही, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. मात्र, या वादाबाबत काँग्रेसचा बचाव करताना म्हणालेत – काँग्रेसचा संभाजीनगर नावाला विरोध नाही, मनसे आणि भाजपा नामांतरावरुन राजकारण करत आहेत ! (Chandrakant Khaire on Congress).

ते म्हणाले, “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात नामांतरावर सहज बोलले असतील. मी काँग्रेसच्या दोन-चार नेत्यांना विचारले. तुम्ही असे कसे बोलले? संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करा, आता तुमच्या घरावर दगडफेक होईल. कशाला विरोध करता? तर ते म्हणाले, असेच विरोध करतो! म्हणजे त्यांना मुस्लीम मतांची आशा आहे. पण मला अनेक मुस्लीम लोकांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा, असे सांगितले.”

खैरे म्हणालेत, “औरंगाबादचे नामांतर हा श्रद्धेचा विषय आहे. ८ मे १९८८ ला आम्ही सगळे नगरसेवक झालो होतो. त्यावेळी शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले होते. विजय मिळाव्यात शिवसेनाप्रमुखांनी जनतेचे आभार मानले होते. ‘कॉमन मिनिमम प्रोग्रॅम’ हा विकासाचा असतो. नामांतराचा विषय हा श्रद्धेचा असतो. हा मुद्दा खरंतर क्लिअर केला पाहिजे. संभाजी महाराजांचे शेवटचे चार महिने इथे गेले. त्यामुळे या शहराचे नामकरण संभाजीनगर झाले पाहिजे”.

“आता संभाजीनगर नावाला विरोध करु नये. जो विरोध करेल त्याला खरी शिवसेना दाखवून देऊ”, असा इशारा खैरेंनी दिला. या मुद्यावर राष्ट्रवादीची भूमिका सकारात्मक आहे. बाळासाहेब थोरातही सकारात्मक आहेत, असा दावा खैरे यांनी केला.

काँग्रेस सरकारमधील पाठिंबा काढूच शकत नाही

“काँग्रेसच्या सध्या 11 जागा आहेत. यापैकी चार जागा हिंदू रहिवासी असलेल्या भागातील आहेत. तर इतर जागा मुस्लीम रहिवासी असलेल्या भागातील आहेत. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक महाआघाडीने एकत्र लढावी की नाही याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात एकत्र घेतील. मात्र, जागावाटप हे आताचे सिटिंग नगरसेवक किती आहेत त्यानुसार होईल. भाजपासोबत युती असतानाही आम्ही अशीच जागावाटप केले होते, असे खैरे म्हणालेत.

“काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढूच शकत नाही. त्यांच्या मंत्र्यांनाही मंत्रिपद हवं की नको? सरकार व्यवस्थित चालू आहे. त्यामुळे कुणीही पाठिंबा काढू शकत नाही”, असा दावाही त्यांनी केला.

एमआयएम किस झाड की पत्ती? ते नुसते लुडबुड करत आहेत. आता मुस्लीम समुदायाचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जास्त पाठिंबा आहे, असे खैरे म्हणाले.

भाजपावर टीका

भाजपा आता नामांतराची मागणी करते आहे. त्यांचे सरकार होते तेव्हा नामांतर का केले नाही? मी स्वत: भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे गेलो होतो. ते म्हणाले की, दोन्ही सरकार आपले पाहिजेत. राज्यात सरकार आल्यावर पंतप्रधान मोदींशीही बोललो. मात्र मोदी काहीच बोलले नाहीत. भाजपाने शहराच्या विकासासाठी काहीही केले नाही. भाजपाची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४२ मंत्र्यांना नामांतराची फाईल दिली होती, अशी माहिती खैरे यांनी दिली.

“ठाकरे सरकार स्थापन होऊन वर्ष जरी झालं असलं तरी आठ ते दहा महिने कोरोना संकटात गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कायदेशीर बाबी तपासल्या आहेत. त्यांनी मार्च महिन्यात सर्व कागदपत्रे मागितले होते. त्यानंतर कोरोना संकट आलं”, असं त्यांनी सांगितलं.

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर व्हावं, अशी घोषणा केली होती. मी त्यादिवसापासून लोकसभा आणि विधानसभेपासून सर्वत्र औरंगाबाद शरहराचा उल्लेख संभाजीनगर असाच करतो. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात त्यांचे पत्र देखील संभाजीनगर या नावाने आले आहेत. आपल्या देशात दोन औरंगाबाद आहेत. नामांतराला काँग्रेस आणि बाळासाहेब थोरात विरोध करुच शकत नाही. संभाजी महाराजांना कोण विरोध करणार? हे मनसे आणि भाजपचं राजकारण आहे. भाजपचं जेव्हा सरकार होतं तेव्हा का नाही केलं?”, असे सवाल त्यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER