औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेचे चौकशीचे आदेश; रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची माहिती

Aurangabad railway Accident - Piyush Goyal

मुंबई : औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात ( करमाड डीएमआयसी परिसर) रेल्वे रुळावर थकून झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडले गेले आहेत. हा भीषण अपघात पहाटे ५.१५ वाजता घडला. यात दोन मजूर गंभीर जखमी असून, तिघे जीव वाचविण्यात यशस्वी ठरले आहेत. सर्व मजूर मध्यप्रदेश येथील असून, ते जालना येथे लॉकडाऊनमध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते. या हृदयद्रावक घटनेनंतर सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

औरंगाबाद रेल्वे दुर्घटना ; मजूरबांधवांचा अपघाती मृत्यू दुर्दैवी : अजित पवार

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट केले आहे. “मदतकार्य सुरू आहे आणि चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दिवंगत आत्म्यांच्या शांततेसाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. ” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, जालना येथील एका कंपनीत मध्यप्रदेश येथील १९ मजूर काम करतात. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हे मजूर जालना येथे अडकले गेले. दरम्यान, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत, अशी माहिती या मजुरांना मिळाली. तसेच भुसावळ येथून मध्यप्रदेशला रेल्वे जाणार असल्याची माहिती या १९ मजुरांना मिळाली असता पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते रेल्वे रुळाच्या मार्गे औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपले. पहाटे अचानक एक मालवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली. काही कळायच्या आत १६ मजूर रेल्वेखाली चिरडले गेले तर दोघे गंभीर जखमी असून तिघे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले आहेत.