
औरंगाबाद : शहरात कोरोनामुक्त होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रविवारी ६७ कोराेनाबाधितांना रूग्णालयातून सुटी देण्यात आल्याची माहिती मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डा. नीता पाडळकर यांनी दिली.
ही बातमी पण वाचा:- औरंगाबाद जिल्ह्यात 1301 कोरोनाबाधित आज 16 रुग्णांची वाढ
जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असलेल्यांपैकी २७ जणांनी कोरोनावर मात केली. दहा दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रविवारी रूग्णालयातून सुटी देऊन घरी पाठवण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. एस.व्ही. कुलकर्णी, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अर्चना भोसले आदी उपस्थित होते. नव्या नियमानुसार, बुहतांश रूग्णांना १० दिवसांच्या उपचारानंतर सुटी दिली जात आहे. दररोज पाच ते दहा रूग्णांना सुटी दिली जात आहे. रविवारी जिल्हा रूग्णालयात २७ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हा रूग्णालयातून एवढ्या मोठ्या संख्येने रूग्णांना सुटी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. जिल्हा रूग्णालयासह मनपा कोविड केअर केंद्रातून ६७ जणांना सुटी देण्यात अली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला