दोन महिन्यांत औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ करा, अन्यथा… मनसे नेत्याचा खैरेंना अल्टिमेटम

Harshwardhan Jadhav - Chandrakant Khaire

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना औरंगाबाद शहराच्या नामांतरावर भाष्य केले होते. औरंगाबादचं नाव बदललं तर काय हरकत? चांगले बदल झाले पाहिजेत, असे म्हणत राज ठाकरे यांनी नामांतराला समर्थन दिले होते. त्यांच्या या विधानावरून शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून कुठल्याही क्षणी ‘संभाजीनगर’ असे नामकरण करण्यात आल्याची घोषणा होऊ शकते. त्यासाठी मनसेची गरज नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मनसेने केलेल्या मागणीची खिल्ली उडवली होती.

राज ठाकरेंनी शेअर केला काश्मिरी तरुणीने मराठीप्रति आदर दाखवलेला व्हिडीओ

आणि हाच धागा पकडत मनसेचे नेते आणि माजी आमदार यांनी खैरेंना अल्टिमेटम दिले आहे. दोन महिन्यांत औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ करा अन्यथा, तुम्हाला निवडणुकीवेळी शहरात फिरू देणार नाही, असा थेट इशारा जाधव यांनी खैरेंना दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जाधव म्हणाले की, खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून कुठल्याही क्षणी ‘संभाजीनगर’ असे नामकरण करण्यात आल्याची घोषणा होऊ शकते, असा दावा केला होता. आता राज्यात त्यांची सत्ता असून, मुख्यमंत्रीही त्यांचाच आहे. त्यांना यात कुठलीच अडचण येणार नाही. येत्या दोन महिन्यांत त्यांनी यावर निर्णय घेऊन नामांतरण करावे. जर ते मुख्यमंत्र्यांकडून औरंगाबादचे नाव संभाजीनगर करू शकले नाही तर निवडणुकीवेळी त्यांना शहरात फिरू देणार नाही, असा थेट इशारा जाधव यांनी खैरेंना दिला. तसेच संभाजीनगरचे नाव घेऊन मत मागता येणार नाही आणि घेताही येणार नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास धरून नव्या वाटचालीला सुरुवात केली आहे. त्यातच आता औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करा! ही शिवसेनेची भूमिका मनसेकडून हायजॅक करण्यात आली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनीही याच मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना हा पक्ष गेल्या वेळी केंद्रात आणि राज्यातही होता. मात्र असे असतानासुद्धा औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करावे यासाठी त्यांनी कुठलाही आवाज उठवला नाही. तर संभाजीनगर करण्याच्या मागणीवरून शिवसनेने फक्त राजकरण केले आहे. त्यामुळे आता लोकांना याबाबत शिवसेनेकडून अपेक्षाही राहिली नाही. मात्र आता आम्ही यासाठी पुढाकार घेणार असून राज्य सरकाराला औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी भाग पाडणार. येणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा आपण मांडणार असल्याचेसुद्धा राजू पाटील म्हणाले होते.

                                                                                                                     सौजन्य:- TV9