डिसेंबरमध्ये औरंगाबाद महापालिका निवडणुकीची शक्यता

Aurangabad Muncipal

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणूकही (Aurangabad municipal elections) डिसेंबर-२०२० (December 2020) मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशी जोरदार चर्चाही सुरू झाली आहे. मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन सुरू झाला. तसेच राज्यात कोरोनाच्या संकटामुळे सर्वच निवडणुका लांबणीवर पडल्या. त्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला होता. निवडणूक लांबणीवर पडल्याने महापालिकेवर प्रशासक नेमावा लागला होता. आता कोरोनाचे (Corona) सावट कायम असताना बिहार विधानसभा निवडणूक घोषित झाली आहे.

आता अनलॉकमुळे परिस्थिती पूर्वपदावर येत असून, केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. कोरोनाचा संसर्ग वाढू नये विधानसभांच्या निवडणुकांच्या तारखा आयोगाकडून काही नियम व अटी घालून जाहीर केल्या आहेत. विशेष म्हणजे मतदानप्रसंगी प्रत्येक मतदाराला हातमोजे घालावे लागणार आहेत. या निवडणुकी विरोधातील याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता रखडलेल्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिका निवडणुकीची शक्यताही बळावली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत निवडणूक घेतली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगामी काळात त्या दृष्टीने इतर तयारीला वेग येण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाला पत्र
दरम्यान, बदललेल्या परिस्थितीत राज्य सरकारने निवडणुका घेण्याची तयारी दर्शवली आहे. राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला तसे पत्रही पाठवले आहे. औरंगाबाद महापालिकेच्या आरक्षण सोडत वॉर्ड रचना यापूर्वीच जाहीर केल्याने निवडणुकीची तारीख जाहीर होणे बाकी आहे.

ही बातमी पण वाचा : कोरोनामुक्त गावातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका शक्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER