औरंगाबाद मनपाचा आकृतिबंधाचा निर्णय घेण्यात येईल : एकनाथ शिंदे

eknath shinde

औरंगाबाद : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या निर्णयाबाबत सोमवारी निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.

आज एकत्रित विकास नियमावली अंमलबजावणी तसेच विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मनपाच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वेळी शिंदे म्हणाले की, “येत्या सोमवारी शासन निर्णय निघणार आहे, यामुळे मनपातील रिक्त जागा भरणे व पदोन्नती देण्याचा मार्ग मोकळा होईल.”

यावेळी एकनाथ शिंदे विकास आराखडा मुद्द्यावरही बोलले. ते म्हणाले की, “प्रस्तावित विकास आराखड्यानुसार डीपी रोडबाबतची आखणी वारंवार करावी. जेणेकरून अनधिकृत बांधकामे होणार नाहीत आणि नागरिकांना याची जाणीव होऊन भविष्यात या ठिकाणी अनधिकृत वस्ती, प्लॉटिंग होणार नाही. याबाबत मनपाने त्वरित अंमलबजावणी करावी.” विविध प्रकारच्या विकास योजनांसाठी शासन निधी देत आहे. मनपाने इतर मनपासारखे उपाययोजना करून स्वनिधी उभारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नवीन उत्पन्न स्रोत निर्माण केले पाहिजे. शासन मदत करेल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

नवीन युनिफाईड डीसीआर नियमावलीनुसार देण्यात येणाऱ्या एफएसआयचा गैरवापर होणार नाही. नवीन घरे घेणाऱ्यांची फसवणूक होणार नाही. अतिरिक्त क्षेत्रफळ वाढल्यामुळे घरांच्या किमती नियंत्रणात राहणार आहेत. तसेच १५०० स्क्वेअर फूटपर्यंत परवानगीची गरज राहणार नाही आणि ३००० स्क्वेअर फुटांपर्यंतच्या बांधकाम परवानगीसाठी नागरिकांनी रीतसर अर्ज करणे आवश्यक आहे. मनपाने १० दिवसांत परवानगी देणे गरजेचे आहे, असे निर्देश देण्यात आले. यावेळी आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे प्रास्तविक केले. यात मनपातर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध योजना आणि प्रकल्पांतर्गत राबविण्यात आलेल्या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER