विश्वासात न घेता लॉकडाऊनचा फर्मान, औरंगाबादच्या खासदाराने व्यक्त केली नाराजी

Imtiyaz Jaleel - Aurangabad Lockdown

औरंगाबाद : कोरोना (Corona) प्रतिबंधक नियम लागू करण्यात आले असले तरी येथे कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याने प्रशासनाने आता औरंगाबादेत (Aurangabad) लॉकडाऊन (Lockdown) लागू केला आहे. ३० मार्च ते येत्या ८ एप्रिलपर्यंत हा निर्णय लागू असेल. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात तसेच जिल्ह्यात ३० मार्च ते ८ एप्रिल पर्यंत लॉकडाऊनचे फर्मान जिल्हाधिकारी यांनी काढले, याची कुठलीच कल्पना खासदार इम्तियाज जलील यांना दिली नाही. त्यामुळे शहरात उलट सुलट चर्चेला चांगलेच उधान आले आहे. या विषयी खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्याशी संपर्क केला असता त्यांना लॉकडाऊन बाबत कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.

मागील काही दिवासांपासू राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. औरंगाबादेतही कोरोना रुग्णांमध्ये रोज मोठी वाढ होत आहे. येथे बाजारपेठ, तसेच इतर सामान खरेद करण्यासाठी लोकांची झुंबड उडत असल्यामुळे रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. फक्त औरंगाबाद मनपा क्षेत्रात हजारो रुग्ण रोज आढळत आहेत. शुक्रवारी दिवसभरात १,५०० पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद केली गेली. ही परिस्थिती गंभीर असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त होत होते. या पार्श्वभूमीवर आता येथील प्रशासनाने कडक पवित्रा धारण केला असून येथे थेट लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

दरम्यान, खासदार इम्तियाज जलील यांनी कुठल्याही प्रकारच्या लॉकडाऊनसाठी सुरुवाती पासूनच विरोध दर्शविला होता. परंतु, शनिवारी लॉकडाऊनची ऑर्डर निघाल्यावर त्यांना या विषयी विचारणा केली असता. त्यांना लॉकडाऊन बाबत कल्पना नव्हती. तसेच त्यांनी या विषयी संपूर्ण माहिती घेऊन, प्रशासन कुठे चुकत आहे. याबाबत पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER