औरंगाबाद महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडीची शक्यता! आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरुन काँग्रेस पदाधिकारी नाराज

Aaditya Thackeray

मुंबई :- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील (Aurangabad) महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) अंतर्गत वाद पुन्हा बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे. युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या दौऱ्यावरुन काँग्रेस (Congress) पदाधिकारी नाराज असल्याची माहिती समोर येत आहे .

ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटन समारंभापासून काँग्रेसला दूर ठेवण्यात आल्याची भावना काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आहे. कारण, काँग्रेसच्या एकाही पदाधिकाऱ्याला या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं नाही. त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी नाराज असून, पुन्हा एकदा औरंगाबादेत महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन होणार आहे. पण आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांना निमंत्रणच देण्यात आले नाही. त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी नाराज असल्याचे बोलले जात आहे.

ही बातमी पण वाचा : आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी औरंगाबादेत बॅनरवॉर, भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ उल्लेख

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER