औरंगाबाद : देशी दारुचे दुकान फोडले

दुकान फोडले

औरंगाबाद : देशी दारुचे दुकान फोडून चोरांनी बारा बॉक्स व १ हजाराची रोकड लंपास केली. ही घटना २६ जून रोजी मध्यरात्री मोंढा नाका येथे घडली. नितेश भगवान प्रसाद जैस्वाल (४०, रा. ज्योतीनगर, उस्मानपुरा) यांचे भागीदारीमध्ये देशी दारुचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोरांनी आत प्रवेश करत दारुचे बारा बॉक्स व गल्ल्यातील १ हजारांची चिल्लर लांबवली. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER