औरंगाबाद पदवीधर : विजयाची हॅटट्रिक करणार, आघाडीचे सतीश चव्हाण यांचा दावा

Satish Chavan

औरंगाबाद : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक करणार, असा दावा केला. चव्हाण यांनी औरंगाबाद येथे विभागीय कृषी कार्यालयात मतदानाचा हक्क बजावला. प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले – दोन टर्म चांगले काम केल्यामुळे मतदार पुन्हा निवडून देतील. विजयाची हॅटट्रिक करणार. (Satish Chavan claims a hat trick of victory)

या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण तर भाजपा कडून शिरिष बोराळकर मैदानात आहेत. सतीश चव्हाण हे सलग दोन वेळा निवडून आले आहे. गेल्यावेळी चव्हाण यांच्याविरोधात बोराळकरच उभे होते. तेव्हा त्यांना पराभव झाला होता.

विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मराठवाड्यातील काही बड्या नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या नेत्यांकडे अनेक शैक्षणिक संस्था आहेत. त्याचा परिणाम यंदाच्या पदवीधर निवडणुकीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपाने यंदा विजयासाठी कंबर कसली आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे कुटुंबियांसह मतदान

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्नी निर्मला आणि मुलगा आमदार संतोष सोबत मतदान केलं. जालनामधील भोकरदन इथल्या जिल्हा परिषदेच्या केंद्रावर दानवे परिवारानं मतदान केले. .

भाजपा-शिवसेना नेत्यांमध्ये जुगलबंदी

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील मतदानाच्या शेवटच्या दिवशी भाजपा आणि शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगली. भाजपाचे खासदार भागवत कराड आणि शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्यात जुगलबंदी झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER