सर्वच जवळचे कार्यकर्ते; बोराळकरांचा अर्ज भरताना पंकजा मुंडेंचे शक्तिप्रदर्शन

Pankaja Munde - Shirish Boralkar

मुंबई : विधानपरिषदेवरील औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून (BJP) शिरीष बोराळकर (Shirish Boralkar) यांनी अर्ज भरला. यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) उपस्थित होते.यावेळी मी नाराज असल्याच्या चर्चा व्यर्थ आहेत. सगळेच माझ्या जवळचे कार्यकर्ते आहेत. मी सगळं बळ लावण्यासाठी इथे आले आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली.

मराठवाडा (Marathwada) औरंगाबाद (Aurangabad) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंच्या समर्थकाने बंडाचे निशाण फडकवल्यानंतर पंकजा मुंडे बोलत होत्या. मी नाराज नाही, सगळ्या चर्चा व्यर्थ आहेत. सगळे माझ्या जवळचे कार्यकर्ते आहेत. सगळीकडे निवडणूक होत आहे. मी सगळे बळ लावण्यासाठी इथे आले आहे, असे पंकजांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले आहे .

पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भाजपसोबत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर यांना पक्षाने अधिकृतरित्या तिकीट दिले आहे. तर बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनीही बंडाचे निशाण फडकवत अर्ज भरला. पोकळे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर जयसिंगराव गायकवाड यांनीही बंडखोरी करत अर्ज भरला. मराठवाड्यातील तीन मोठ्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने भाजपला धक्का बसल्याची माहिती आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER