
औरंगाबाद : शहरातील जयभीमनगर आणि जाधववाडी येथील कोरोनाबाधित वृद्धांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. या २ मृत्यूमुळे शहरातील आतापर्यंतची कोरोनाबळींची संख्या ५८ झाली आहे. जयभीमनगर येथील ७२ वर्षीय वृद्धाचा जिल्हा रुग्णालयात २४ मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्याच दिवशी रुग्णाला घाटीत संदर्भीत करण्यात आले.
ही बातमी पण वाचा:– कोरोना मृत्युचे वाढते प्रमाण चिंताजनक : औरंगाबाद जिल्हाधिकारी
भरतीवेळीच रुग्णाची प्रकृती गंभीर होती. मधुमेह, बीपी आदी व्याधीसह तीव्र श्वसन विकारामुळे त्यांना कृत्रिम श्वास देण्यात आला होता. त्यांचा कोरोनामुळे २६ मे मध्यरात्री ६ वाजून ५० मिनिटांनी मृत्यू झाला. जाधववाडी येथील ५७ वर्षीय पुरुष रुग्णाला १८ मे रोजी घाटीच्या कोव्हिड वॉर्ड सहा मध्ये भरती करण्यात आले. छातीचा व मेंदूचा क्षयरोग आणि श्वसन विकाराने त्यांना ग्रासलेले होते. १९ मे रोजी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. प्रकृती गंभीर बनली. अखेर सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला