औरंगाबाद : कोविड रुग्णालय १० दिवसांत सुरू

Aurangabad- Covid Hospital starts in 10 days

औरंगाबाद :- चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील सिपेटची इमारत कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या हॉस्पिटलवर एमआयडीसी सहा ते सात कोटी रुपयांचा खर्च करत आहे. ते हॉस्पिटल येत्या १० दिवसांत पालिकेला सुपूर्द करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री तथा उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी कळवली आहे.

ही बातमी पण वाचा : औरंगाबादमध्ये 22 रुग्णाची वाढ जिल्ह्यात एकूण 1327 कोरोनाबाधित  

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी २५० खाटांचे कोविड हॉस्पिटल येथे असेल. तेथे वीज, पाणी, ड्रेनेज सुविधांचे काम सुरू आहे. शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात विनावापर राहिलेल्या पूर्वीच्या मेल्ट्रॉन कंपनीच्या इमारतीत कोविड केअर सेंटर (हॉस्पिटल) उभारण्यास सुरुवात केली आहे.


Web Title : Aurangabad covid hospital starts in 10 days – Subhash Desai

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER