औरंगाबाद : भांड्याच्या दुकानातून १९ हजार रूपये लांबविले

Aurangabad-cash stolen from shop

औरंगाबाद :- उस्मानपुरा परिसरातील शंकर स्टील सेंटर या भांड्याच्या दुकानातून दोन जणांनी १९ हजार रूपये शिताफीने लंपास केले. दिपक शंकरलाल सोळंकी (वय २३, रा.सातारा परिसर) यांचे उस्मानपुरा परिसरात शंकर स्टील सेंटर नावाचे भांड्याचे दुकान आहे. ६ जानेवारी रोजी दिपक सोळंकी हे दुकानात दुपारी २ वाजेच्या सुमारास दिवसभर झालेल्या धंद्याची रक्कम मोजत होते, त्यावेळी दुकानात आलेल्या एका महिला व पुरूषाने पैसे मोजून देतो असे म्हणत शिताफीने १९ हजार रूपये लंपास केले. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार धवन करत आहेत.

ही बातमी पण वाचा : विमानतळावरून सोन्याची साखळी लंपास