राज्यात मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी मराठा समन्वयकांना अटक का? आबासाहेब पाटलांचा सवाल

abasaheb patil

मुंबई : नाशिकमध्येही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दौऱ्यापूर्वी काही मराठा प्रतिनिधींना अटक करण्यात आले होते. हे सर्व का आणि कशासाठी सुरु आहे? असा सवाल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी राज्य सरकारला विचारला आहे. राज्यात सध्या मंत्र्यांचे दौरे सुरु आहेत. अशावेळी स्थानिक मराठा समन्वयकांना अटक केली जात आहे .

मराठ्यांची धरपकड करुन जेलभरती करायची असेल तर सरकारनं स्पष्ट सांगावं. पाच कोटी मराठा समाज स्वत: जेलभरो करेल, असा आव्हानही आबासाहेब पाटील यांनी राज्य सरकारला दिले आहे.

उद्योगमंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांचा औरंगाबाद दौरा आहे. मात्र, देसाई यांच्या दौऱ्यापूर्वीच मराठा मोर्चाचे राज्य समन्वयक रमेश केरे यांना पुंडलिक नगर पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी नाशिकमध्येही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्यापूर्वी काही मराठा प्रतिनिधींना अटक करण्यात आले होते. हे सर्व का आणि कशासाठी सुरु आहे? असा प्रश्न आबासाहेब पाटील यांनी विचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER