आयपीएलसाठी लिलाव आज, 61 जागांसाठी 292 खेळाडू

आयपीएल 2021 (IPL 2021) साठी आज (18 फेब्रुवारी) रोजी चेन्नई येथे दुपारी 3 वाजेपासून लिलाव होणार आहे. त्यात 61 जागांसाठी 292 खेळाडू उपलब्ध आहेत. त्यात राजस्थान रॉयल्सने रिलीज केलेला स्टिव्ह स्मिथ कोणत्या संघात जाईल? , अर्जुन तेंडूलकरला किती किंमत मिळेल? कोणते खेळाडू अनसोल्ड राहतील? हरभजन व केदार जाधवला दोन कोटी रुपयांची तगडी बेस प्राईस मिळेल का? आणि तब्बल 13 रिकाम्या जागा असणाऱ्या रॉयल चॕलेंजर्स बंगलोर संघाचा नवा चेहरा कसा असेल, याची उत्सुकता आहे.

आयपीएल संचालन मंडळाने खेळाडूंच्या खरेदीसाठी प्रत्येक संघाला 85 कोटींच्या निधीची मर्यादा घातली आहे. एवढ्या रकमेच्या आतच त्यांना जे काही खेळाडू आपल्या तंबूत आणायचे ते आणता येतील. यंदा ही रक्कम वाढवली जाण्याचा अंदाज होता पण तसे झालेले नाही.

या 85 कोटींपैकी आता फ्रँचाईजींकडे शिल्लक असलेला निधी व रिक्त जागा अशा…

संघ———- रिक्त ——पैसे
सीएसके—— 7 ——- 22.90
दिल्ली ——– 6 ——- 12.90
पंजाब ——– 9 ——- 53.20
कोलकाता — 8 ——- 10.75
मुंबई ———- 7 ——- 15.35
राजस्थान —- 8 ——– 34.85
बंगलोर —— 13 ——- 35.90
हैदराबाद —– 3 ——– 10.75

(रक्कम कोटींमध्ये)

भारतीय खेळाडू – 164
परदेशी खेळाडू- 128
असोसीएट संघांचे खेळाडू- 3
कॅपड् खेळाडू- 113
अनकॕपड् खेळाडू – 176
रिक्त जागा – 22 परदेशी
रिक्त जागा- 39 भारतीय

सर्वाधिक बेस प्राईस- दोन कोटी रुपये (10)

हरभजन सिंग (Harbhajan Singh)
केदार जाधवसह (Kedar Jadhav)
ग्लेन मॕक्सवेल,
स्टिव्ह स्मिथ,
शकिब अल् हसन,
मोईन अली,
सॕम बिलिंग्ज,
लियाम प्लंकेट,
जेसन रॉय
मार्क वूड.

दीड कोटी बेस प्राईस (12)

अॕलेक्स हेल्स,
डेव्हिड मालन,
अॕलेक्स कॅरी,
नेथन कोल्टर नाईल,
झे रिचर्डसन,
मुजीब उर रहमान,
आदिल राशिद,
शाॕन मार्श,
टॉम करन,
डेव्हिड विली,
लुईस ग्रेगरी,
मोर्ने मोर्केल

एक कोटी बेस प्राईस (11)

हनुमा विहारी,
उमेश यादव
मॕथ्थ्यू वेड,
बिली स्टॕनलेक,
मार्नस लाबूशेन,
मुस्तफिजूर रहमान,
शेल्डन कॅट्रेल,
आरोन फिंच,
मोझेस हेन्रिक्स,
जेसन बेहरेनडॉर्फ
एर्विन लुईस

फ्रँचाईजीनी रिलीज केलेले खेळाडू

सीएसके( 6) – केदार जाधव, मुरली विजय, हरभजन सिंग, पियुष चावला, मोनू सिंग आणि शेन वाॕटसन

दिल्ली कॕपिटल्स (6) – अॕलेक्स कॕरी, किमो पॉल, तुषार देशपांडे, संदीप लामीछाने, मोहित शर्मा, जेसन रॉय

किंग्ज इलेव्हन पंजाब (9) – ग्लेन मॕक्सवेल, शेल्डन काॕट्रेल, मुजीब झाद्रान, हार्दुस व्हिलोयेन, जेम्स निशॕम, के. गौतम, करुण नायर, जगदीश सुचित, तेजिंदरसिंग धिल्लन

कोलकाता नाईट रायडर्स (6) – ख्रीस ग्रीन, हॕरी गर्नी, एम. सिध्दार्थ, निखील नाईक, सिध्देश लाड आणि टॉम बँटन

मुंबई इंडियन्स (7) – प्रिन्स बलवंत राय, दिग्विजय देशमुख, लसिथ मलिंगा, नेथन कोल्टर नाईल, जेम्स पॕटिसन, शेरफैन रुदरफोर्ड, मिशेल मॕक्लेघलन

राजस्थान राॕयल्स (8)- स्टिव्ह स्मिथ, आकाश सिंग, अनिरुध्द जोशी, अंकित राजपूत, ओशाने थाॕमस, शशांक सिंग, टॉम करन, वरुण आरोन

रॉयल चॕलेंजर्स बंगलोर (10) -.ख्रिस माॕरिस, शिवम दुबे, आरोन फिंच, उमेश यादव, डेल स्टेन, मोईन अली, पार्थिव पटेल, पवन नेगी, इसुरु उदाना, गुरुकिरत मान

सनरायजर्स हैदराबाद (5)- बिली स्टॕनलेक, संदीप भावंका, फेबियन अॕलन, संजय यादव, पृथ्वीराज यारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER