माझ्या आयुष्यातील पुण्य धनंजय मुंडेंना मिळो…

Atyarao-lahane -Dhanajay Munde

अहमदनगर :-  राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे कायम गोरगरीब लोकांची सेवा करण्यास प्राधान्य देतात. त्यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द प्रचंड मोठी होणार आहे. त्यासाठी माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळो,” अशा शब्दात डॉ. तात्याराव लहाने (Tatyarao Lahane)यांनी धनंजय मुंडे यांच्याप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या.

“धनंजय मुंडे यांना मी लहानपणापासून ओळखतो. गेल्या सरकारच्या सत्ताकाळात मला काही अडचणी आल्या. मी मोठा त्रास सहन केला. केवळ नातेवाईक किंवा शासनाचा कर्मचारी म्हणून नव्हे तर दोघांनीही सेवाव्रत स्वीकारलेले आहे. याच नात्याने धनंजय मुंडे यांनी मला त्या संकटातून सोडवण्यासाठी मोलाची मदत केली. असे वक्तव्य पद्मश्री तात्याराव लहाणे यांनी केले तसेच, लहाणे यांनी धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.

त्याचप्रमाणे तात्याराव लहाणे यांनी मोठा गौप्यस्फोटही केला आहे. “गेल्या सरकारच्या सत्ताकाळात मला काही अडचणी आल्या. मी मोठा त्रास सहन केला,” असे लहाने म्हणाले.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील संत वामनभाऊ – संत भगवानबाबा प्रतिष्ठान यांच्यावतीने संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. लहाने यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी धनंजय मुंडे यांचे येथेही जंगी स्वागत करण्यात आले. अहमदनगरपासून प्रत्येक गावात पक्ष कार्यकर्ते-समर्थकांनी ठिकठिकाणी हारा-फुलांनी उत्साहात स्वागत केले. अगदी काही ठिकाणी तर जेसीबीतून फुले उधळत, वाजत गाजत क्रेनने हार घालून मुंडेंचे स्वागत करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER