अतुल कुलकर्णीने दहावीत प्रथमच केला होता अभिनय

Atul Kulkarni

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारा दिग्गज अभिनेता अतुल कुलकर्णीचा (Atul Kulkarni) १० सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो. अतुलने बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक चित्रपटांत काम केले आहे. तो चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसला आहे. हिंदीशिवाय अतुल कुलकर्णीने मराठी, कन्नड, मल्याळम, तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे.

अतुल कुलकर्णीचा जन्म १० सप्टेंबर १९६५ रोजी कर्नाटकात झाला होता. त्याने प्रारंभिक शिक्षण कर्नाटकातून केले होते. अतुल कुलकर्णी दहावीत असताना शाळेत पहिल्यांदा अभिनय केला होता. त्यानंतर त्याने शाळा ते महाविद्यालयीन नाट्यगटांमध्ये प्रवेश केला जिथे त्याने अभिनयाची कौशल्ये शिकली. यानंतर अतुल कुलकर्णीने कलाकार होण्याचे ठरविले.

अतुल कुलकर्णीने १९९५ मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून डिप्लोमा केला होता. त्यानंतर तो चित्रपटांकडे वळला. अतुल कुलकर्णीचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट ‘हे राम’ होता. या चित्रपटात त्याच्यासोबत शाहरुख खान (Shahrukh Khan), राणी मुखर्जी (Rani Mukerji), नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah), गिरीश कर्नाड (Girish Karnad), ओम पुरी (Om Puri) हे दिग्गज कलाकार होते. अतुल कुलकर्णीचा चित्रपट आणि त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

‘हे राम’ या चित्रपटा नंतर अतुल कुलकर्णीने बर्‍याच दमदार चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. तसेच अनेक चित्रपटात खलनायक बनून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. २००६ मध्ये अतुल कुलकर्णीचे आमिर खानबरोबर रंग दे बसंती या चित्रपटात काम केल्यावर त्याचे व्यक्तिमत्त्व अधिक दृढ झाले. एका मुलाखतीत पात्र निवडण्याच्या निकषांबद्दल विचारले असता अतुल कुलकर्णी म्हणायला, “माझा दृष्टीकोन एका पात्राऐवजी संपूर्ण कथेवर आहे. कथा निर्माता किंवा दिग्दर्शक मला जे ऐकवत आहेत हे प्रेक्षकांना आवडेल की नाही हे मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मी प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून कथा ऐकतो आणि त्यानुसार निर्णय घेतो. “

अतुल कुलकर्णीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना त्याची पत्नी नाट्य कलाकार गीतांजली कुलकर्णी आहे. अभिनयाशिवाय दोघेही लहान मुलांसाठी स्वयंसेवी संस्था (एनजीओ) देखील चालवतात. क्वेस्ट एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट असे या एनजीओचे नाव आहे. याद्वारे अतुल कुलकर्णी आणि गीतांजली कुलकर्णी १४ वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षण प्रदान करतात. अतुल कुलकर्णी अखेर बॅंडीश बॅंडिटस या वेब सीरिजमध्ये दिसला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER