… हेच शिवसेनेचे कर्तृत्व’; अतुल भातखळकर यांचे शिवसेनेवर टीकास्त्र

Maharashtra Today

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona)संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. मात्र लसीचा पुरवठा नसल्यामुले राज्यातील लसीकरण लांबणीवर पडले आहे. अशात पुढील दोन दिवस मुंबईतील सर्व कोरोना लसीकरण केंद्र बंद ठेवली जाणार आहे. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर(Atul-bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर (Shivsena)टीकास्त्र सोडले .

अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, फक्त बॅनरबाजी आणि पीआर बाजी ! मुंबई महापालिकेने(BMC) उद्या 15 आणि 16 रोजी लसीकरण बंद असल्याचं जाहीर केलं आहे. एक लसीकरण केंद्र आणि शंभर बॅनरची पीआर मात्रा हेच शिवसेनेचे कर्तृत्व आहे, असे ते म्हणाले आहेत .

दरम्यान मुंबईकरांनो, आम्ही सूचित करू इच्छितो की 15 आणि 16 मे 2021 रोजी लसीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात येत आहे. लसीकरणाविषयी पुढील माहिती आपल्याला लवकरच कळवण्यात येईल, असे ट्वीट मुंबई महापालिकेने केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button