भाजपचा टोला : आता फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडायची बाकी आहेत

मुंबई :- मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहतोय, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. आता महाविकास आघाडीत फक्त राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडायची बाकी आहेत, असा टोमणा भातखळकरांनी मारला.

“गेली २० वर्षे  राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे. ” असं जयंत पाटील म्हणाले. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये कार्यक्रमासाठी गेले असताना जयंत पाटील यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्रिपदाबाबतचं स्वप्न उघड केलं. जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मोजक्या शब्दात ट्विटरवर प्रतिक्रिया दिली, मात्र महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील डझनभर नेत्यांवर त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्याचं काम केलं.

ही बातमी पण वाचा : शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ : अतुल भातखळकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER