‘सोनाराने कान टोचले ते बरेच झाले’, पवारांच्या विधानावरून भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

Atul Bhatkhalkar - Uddhav Thackeray - Sharad Pawar

मुंबई : ‘राज्यात शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवा, हे भाषण मी तीस वर्षांपासून ऐकत आलेलो आहे’, असं म्हणत राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) शेलक्या शब्दात टोला लगावला. त्यानंतर आता भाजप (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ‘सोनाराने कान टोचले ते बरेच झाले’, असं खोचक ट्विट केल आहे.

महाराष्ट्रावर शिवसेनाचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याची माहिती आहे. शरद पवारांना यावरच प्रतिक्रिया विचारली असता, ‘हे भाषण मी गेल्या ३० वर्षांपासून ऐकतो आहे’, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला.

शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना काढलेल्या चिमट्यानंतर आमदार अतुल भातखळकर यांनी सेनेला डिवचलं आहे. पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर हा घ्या घरचा आहेर, ‘सोनाराने कान टोचले ते बरेच झाले’, असं ट्विट भातखळकरांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER